नगरपालिका निवडणुकीसाठी(elections) परस्पर विरोधी दोन्ही गट कागलमध्ये एकत्र आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या युतीचा किस्सा राज्यभर गाजला. मात्र मंत्री मुश्रीफांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा संपावा आणि घाटगे यांच्या मालमत्तेचे प्रकरण मिटावं, यासाठीच ही अनपेक्षित युती झाली असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली. त्यामुळं आता कागल आणि मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत घाटगे-मुश्रीफ विरुद्ध मंडलिक असा संघर्ष होणार असल्याची स्पष्ट चिन्ह आता दिसू लागली आहेत.

कागल नगरपालिकेसाठी दिलेल्या उमेदवारांना खबरदारी म्हणून अज्ञातस्थळी हलवण्यात आलं आहे. या उमेदवारांना आमिष आणि प्रलोभन दाखवू शकतात यासाठीच ही खबरदारी शिवसेनेकडून घेण्यात आली असल्याचे मंडलिक यांन सांगितले. ते म्हणाले, प्रत्यक्ष निवडणूक (elections)आणि प्रचाराला सुरुवात होईल, तेव्हा कागल आणि मुरगुड शहरातील जनताच या उमेदवारांच्या मागं खंबीरपणे उभी राहील. कागलच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर मी अस्वस्थ झालो, एकटा पडलो अशी टीका माझ्यावर झाली. मात्र या प्रसंगाने मी अधिक खंबीर झालो आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सदाशिवराव मंडलिक एकटे पडले, अशी चर्चा होती. त्यावेळी कोल्हापूरच्या जनतेने त्यांना उचलून धरलं. त्याचाच प्रत्यय कागल आणि मुरगुडच्या नगरपालिका निवडणुकीत येईल, असा विश्वासही मंडलिक यांनी व्यक्त केला.राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणाऱ्या कागल तालुक्यात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर भाजपाचे माजी आमदार संजय घाटगे यांच्या गटात अस्वस्थता पसरली होती. यावर मंत्री मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांची समजूत काढू असं वक्तव्य केलं होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संजय घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट झाली. दरम्यान, घाटगे पिता-पुत्रांनी आपण भाजपासोबत जाणार असल्याचे स्पष्ट केलं असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ समजूत काढण्यात यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :
कोल्हापूर येथील कागलमध्ये महायुतीत गोंधळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी
इतना डरना जरुरी है…!
..तर माझा मृत्यू होईल,’ अक्षय कुमारचं नाव घेत शेफाली शाहने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव
Edit