देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आपल्या ग्राहकांना एफडी खात्यांवर आकर्षक व्याजदर देत आहे. आरबीआयच्या रेपो दर कपातीमुळे अनेक बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरात(interest) कपात केली असली तरी, SBIच्या काही एफडी योजना अजूनही चांगला परतावा देत आहेत.

SBI मध्ये ग्राहक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी उघडू शकतात. यावर बँकेने 3.05% ते 7.10% पर्यंत व्याजदर जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, 444 दिवसांच्या “अमृत वृत्ती” विशेष एफडी योजनेत सामान्य नागरिकांना 6.60% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.10% व्याज मिळत आहे.
उदाहरणार्थ, जर आपण सामान्य नागरिक असाल (वय 60 वर्षांखाली) आणि SBIमध्ये 5 वर्षांसाठी 1 लाख रुपये एफडी केले, तर मॅच्युरिटीवर आपल्याला एकूण 1,35,018 रुपये मिळतील, ज्यात 35,018 रुपये निश्चित व्याज समाविष्ट आहे.त्याचप्रमाणे, जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल (वय 60 वर्षे किंवा अधिक), तर 5 वर्षांच्या एफडीवर 1 लाख रुपयांवर 1,41,826 रुपये मिळतील, ज्यात 41,826 रुपये व्याज आहे.
एसबीआयच्या या एफडी योजना सुरक्षित असल्यासोबतच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे ज्या लोकांना निश्चित व्याजदराची (interest)अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी ही योजना चांगली संधी ठरू शकते.

हेही वाचा :
लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर!
ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल
मनी प्लांटची पाने पिवळी होणार नाहीत? ‘या’ टिप्स फॉलो करा