सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर गावचा १६ वर्षीय शौर्य प्रदीप पाटील या दहावीतील विद्यार्थ्याने दिल्लीत राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनवरून (metro)उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिक्षण घेणाऱ्या शौर्यने शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा धक्कादायक खुलासा त्याच्या सुसाईड नोटमधून झाला आहे. १८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

राजा गार्डन मेट्रो (metro)पोलिसांनी शौर्यच्या बॅगेतून मिळालेल्या दीड पानांच्या सुसाईड नोटच्या आधारावर शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह तीन शिक्षिकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नोटमध्ये शौर्यने थेट शिक्षकांवर मानसिक छळ केल्याचा उल्लेख करत आपल्या पालकांची माफीही मागितली आहे.

शौर्यचे वडील प्रदीप पाटील अनेक वर्षांपासून कुटुंबासह नवी दिल्लीतील राजीव नगर भागात स्थायिक असून ते मूळचे सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर येथील आहेत. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. शौर्यचा अंत्यविधी आज, २० नोव्हेंबर २०२५ रोजी ढवळेश्वर येथे करण्यात येणार आहे.

या दुःखद घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे, तर पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

शेख हसीना!”सजा ए मौत” न्याय कि, न्यायाची थट्टा ?
अननस खाण्याअगोदर ‘हे’ वाचा, ‘या’ लोकांसाठी अतिशय घातक
जुनं वाहन वापरणाऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा धक्का!