सोशल मिडियाच्या दुनियेत रोज काही ना काही व्हायरल होत असतं. इथे अशी बरीच दृश्ये शेअर केली जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. काही हास्यस्पद, काही थक्क करणारे तर काही हादरवणारे व्हिडिओज इंटरनेटवर आपल्या समोर येत असतात. आता मात्र इथे एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला पाहताच तुमच्या पायाखालची जमिन हादरेलं. व्हिडिओत काही मुलांनी मिळून उंदराला(rat) एक अनोखी शिक्षा दिल्याचे व्हिडिओत दिसून आले. ही शिक्षा फक्त उंदरालाच नाही तर यूजर्सनाही चकित करणारी ठरली. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

आपल्या घरात घुसणारी उंदरं आपल्यासाठी त्रासदायक ठरतात. ही उंदरं एकदा का आपल्या घरात शिरली की मग त्यांच संपूर्ण कुटुंब तुमच्या घरात आसरा घेत आणि आपल्या घरात यांचा वावर वाढत जातो. उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी अनेक नवनवीन उपाय केले जातात. पण व्हिडिओत या मुलांनी मात्र उंदराला पकडून त्याला चक्क शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की काही मुलांनी त्यांच्या घरात उंदीर पकडला आणि त्यानंतर तो कपड्यांच्या दोरीवर लटकवून टाकला. ज्याप्रमाणे कपडे लटकवण्यासाठी चिमटा वापरला जातो, त्याचप्रमाणे त्यांनी चिमट्याने उंदीराची शेपटी लटकवली, उंदीर जिवंत होता. ही अनोखी आणि भयानक शिक्षा पाहता उंदीर चुकूनही आता त्यांच्या घरात प्रवेश करणार नाही एवढं नक्की.
मुलांनी उंदराला (rat)दिलेल्या या शिक्षेचा व्हिडिओ @adi_tiwary नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे, तो किती क्यूट आहे, सोडा त्याला माफ करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उंदीर रडत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याची शेपटी तुटून जाईल रे”.

हेही वाचा :
जुने पॅन कार्ड अपग्रेड कसे करावे? ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या
Rohit Sharma इज बॅक! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडेचे नेतृत्व ‘हिटमॅन’कडे
अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral