साधारणपणे सगळेचजण थकवा घालवण्यासाठी किंवा फ्रेश वाटावं यासाठी दिवसातून कितीतरी वेळा कॉफी पित असतात. कॉफी(coffee)पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अयोग्य वेळेस आणि जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास ती आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदानुसार कॉफीमुळे शरिरातील पित्त आणि वात वाढण्याची शक्यता असते. उपाशी पोटी कॉफीचे सेवन केल्याने शारिरीक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

शिवाय सगळ्यांच्या शरिरावर वेगवेगळे परिणाम होतात. त्यामुळे कॉफीचे (coffee)सेवन कोणी, कधी आणि कितीवेळा करावे हे माहित असणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार ज्यांना गॅस, पित्त, उच्च रक्तदाब आणि झोप न येणे अशा समस्या असतील त्यांनी कॉफीचे सेवन कधीच करू नये. याउलट ज्यांना कफ किंवा कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यास समस्या जाणवत असतील तसेच सतत आळस जाणवत असेल त्यांनी कॉफीचे सेवन करण्यास हरकत नाही.

कॉफी पिण्याचे फायदे :
कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. काही अभ्यासानुसार कॅफिनयुक्त कॉफी प्यायल्याने नैराश्याचा धोका कमी करण्यास मदत होते. कॅफिन मेंदूला उत्तेजित करते, ज्यामुळे एकाग्रता, सतर्कता आणि स्मरणशक्ती सुधारते. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, कमी प्रमाणात कॉफी पिल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. शिवाय तोंड, घसा आणि पचनसंस्थेच्या कर्करोगापासून संरक्षण होते. कॉफीमधील कॅफिक अॅसिड नावाचे अँटिऑक्सिडंट त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते. एवढेच काय तर वजन कमी करण्यासही कॉफी फायदेशीर ठरते.

कॉफी पिण्याचे तोटे :
योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास ती फायदेशीर ठरते. पण जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास निद्रानाश होऊ शकतो किंवा झोपेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये असलेले आम्ल आणि कॅफिन पोटातील आम्लाचे उत्पादन वाढवतात. यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी, मळमळ आणि पोटात जळजळ होऊ शकते. शरिरात कॅफिनचे प्रमाण वाढल्याने अस्वस्थता आणि चिंता वाढते. हृदयाची गती वाढून रक्तदाबही वाढू शकतो.

कॉफीचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी :सकाळी उपाशी पोटी कॉफी पिऊ नये,संपूर्ण दिवसात फक्त एक कप कॉफी प्यावी,कॉफी पिल्यानंतर थोडावेळ चालावे.कॉफीमध्ये कमी साखर घाला आणि चवीनुसार वेलची पूड घाला,कॉफी बनवण्यासाठी रोस्टेड कॉफी पावडरचा वापर करा.

हेही वाचा :

सीएनजी पुरवठा कधीपर्यंत सुरु होणार? MGL ने दिलं अपडेट…
जमिनीच्या स्टॅम्प ड्यूटीबाबत राज्य सरकरने घेतला मोठा निर्णय!
एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार…