प्रेमात माणूस बायकोचा गुलाम होतो हा वाक्यप्रचार तर आपण अनेकदा ऐकला असेल. प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यात व्यक्ती शक्ती असूनही खाली झुकला जातो. हे फक्त माणसांवरच लागू होत नाही तर प्राण्यांमध्येही हे दिसून येतो. आता हेच बघा ना, जंगलाचा राजा म्हणून ज्याची सर्वत्र ख्याती असा सिंह(lion) चक्क कुणाला तर त्याच्या बायकोला घाबरला. मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करणाऱ्याने सिंहाने बायकोचा मार मात्र निमूटपणे सहन केला. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

सोशल मिडियावर सिंहाचा हा व्हिडिओ आता चांगलाच ट्रेंड करत आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सिंहाच कुटुंब जंगलात विश्रांती करत असल्याचं दिसून येतं. याच दरम्यान सिंहाचं पिल्लू आपल्या वडिलांसोबत खेळण्याचा प्रयत्न करतो पण सिंह काही खेळण्याच्या मूडमध्ये नसल्याने तो त्याला घाबरवून दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व दृश्य बाजूला बसलेली सिंहींण आपल्या डोळ्यांनी बघत असते. पिल्लाला सिंह (lion)घाबरवत आहे हे पाहून सिंहीण रागातच उठते आणि सिंहाच्या कानशिलात लगावते. सिंह देखील निमूटपणे आपली चूक मान्य करतो आणि निमूटपणे सिंहीणीचा मार खातो. जंगलातील हा मजेदार क्षण आता सोशल मिडियावर जोरदार शेअर केला जात आहे. सिंहाला असं सिंहीणीचा मार खाताना पाहून यूजर्स आता चांगलेच खुश झाले आहेत. सिंह देखील बायकोला हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @sadcattv नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिंह म्हणत असेल, माफ करा बॉस. तुम्ही बरोबर आहात. शेवटी तो आमचा छोटा मुलगा आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच तुम्हाला दोन्ही पालकांची गरज आहे. ते एकमेकांनाही मदत करतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आईशी पंगा घेऊ नये”.

हेही वाचा :
एकाच फोनमध्ये 2-3 WhatsApp अकाऊंट चालवता येणार?
संजय पाटील यड्रावकर व राजू शेट्टींच्या पीएमध्ये सभागृहातच खडाजंगी
मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे