चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल 2026 पूर्वी रवींद्र जडेजा, मथीशा पाथिराणा, सॅम करन, डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र सारख्या प्रमुख खेळाडूंना (players)रिलीज केले. ज्यामुळे विदेशी सलामीवीर, डेथ-ओव्हर गोलंदाज आणि देशांतर्गत ऑलराऊंडर भूमिकांसाठी संघात जागा शिल्लक आहेत. आयपीएल 2026 ऑक्शनमध्ये सीएसकेची रणनीती ही उच्च-प्रभाव पडणाऱ्या खेळाडूंना संघात घेणं असेल. ज्यामध्ये सीएसके क्विंटन डी कॉक, फाफ डू प्लेसिस, रीस टॉपली, गेराल्ड कोएत्झी आणि भारतीय ऑलराऊंडर वेंकटेश अय्यर किंवा मोहित शर्मा सारख्या खेळाडूंना लक्ष्य करू शकेल.

ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि एमएस धोनीच्या पुनरागमनामुळे, सीएसके आयपीएल 2026 च्या विजेतेपदासाठी आव्हान देण्यासाठी संतुलित, स्पर्धात्मक संघ तयार करण्याचे लक्ष्य ठेवते.आयपीएल 2026 ऑक्शनसाठी चेन्नई सुपरकिंग्सकडे 43.4 कोटी रुपये आहेत. त्यामुळे सीएसके ही सर्व फ्रँचायझींमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च पर्स असलेली टीम आहे. यामुळे ते देशांतर्गत आणि विदेशी खेळाडूंवर मोठी बोली लावू शकतात.

चेन्नई सुपरकिंग्सला ऋतुराज गायकवाडसोबत ओपनिंग करण्यासाठी डावखुरा, आक्रमक ओपनिंग फलंदाज हवा आहे. या जागेसाठी क्विंटन डी कॉक आणि फाफ डू प्लेसिस या खेळाडूंवर (players)सीएसकेचे लक्ष्य असेल. पाथिरानाच्या जाण्याने टीम इंडियाला वेगवान गोलंदाजांची जागा भरून काढायची आहे. यासाठी सीएसके रीस टॉपली, जेराल्ड कोएत्झी यांना लक्ष्य करू शकते किंवा डेथ ओव्हर गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करून बाय बॅक करण्याचा प्रयत्न देखील करू शकते. स्टार ऑल राउंडर जडेजाची पोकळी भरून काढण्यासाठी, चेन्नई सुपर किंग्ज व्यंकटेश अय्यर किंवा मोहित शर्मा सारख्या भारतीय ऑलराऊंडर खेळाडूंना खरेदी करू शकते.यंदा आयपीएल 2026 साठीचं मिनी ऑक्शन येत्या 15 किंवा 16 डिसेंबर रोजी अबुदाबी येथे होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

शुभमन गिल आणि गाैतम गंभीर यांच्यात मोठे मतभेद, थेट भारतीय संघाला फटका
११ वर्षांनंतर रेखाचा कमबॅक? बॉलिवूडपासून दूर असूनही ३०० कोटींची संपत्तीची मालकीण!
बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, व्हिडीओ व्हायरल