राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळच्या वेळेत तीव्र गारठा तर दुपारी वाढलेली उष्णता असा अनियमित हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने देशभरासाठी मोठा हवामान इशारा जारी केला आहे. थंडीच्या(weather) तीव्र लाटेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक राज्यांमध्ये पुढील 24 तास अत्यंत धोकादायक ठरणार असल्याचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट सुरू झाली आहे. तर दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही प्रशासनाने मोठा अलर्ट जारी केला असून पुढील तीन दिवस तापमानात जबरदस्त चढ-उतार अनुभवायला मिळणार आहेत.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर अचानक वाढल्यामुळे राज्यातील अनेक भागात गारठा जाणवू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तापमान तब्बल 8 अंशांपर्यंत घसरले असून सकाळ-संध्याकाळ तीव्र थंडीचे वातावरण आहे. नागरिक ऊब मिळवण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. रस्त्यांवर, गल्लीबोळात आणि बाजारपेठांमध्ये शेकोट्यांभोवती गर्दीही वाढत आहे.उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात 3 ते 8 अंशांची मोठी तापमानघट नोंदली गेली आहे. राज्यातील काही भागांमध्ये 6.2 अंशांपर्यंत नीचांकी तापमान आढळून आले आहे. आहिल्यानगर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, भंडारा, नागपूर, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पारा 10 ते 11 अंशांखाली गेला असून थंडीचा कडाका वाढत चालला आहे.

भारतीय हवामान विभागाने 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान देशातील(weather) अनेक भागांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. काही ठिकाणी वादळ, जोरदार वारे, विजांचा कडकडाट यासोबतच पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू शकतात, त्यामुळे मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दक्षिणेकडे केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्रात जरी मुसळधार पावसाचा मोठा धोका नसला तरी तापमानातील अचानक घट आणि थंड वाऱ्यांचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांवर विशेष लक्ष ठेवावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?
‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचा दरात मोठी घसरण