बहुतेक घरांमध्ये कामाच्या व्यस्ततेमुळे महिला सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात किंवा रात्रीच पीठ मळून दुसऱ्या दिवशी रोट्या, पराठे बनवतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, पीठ जास्त वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते(refrigerator).

गव्हाच्या पिठामध्ये प्रथिने, स्टार्च, फायबर, बी-व्हिटॅमिन, फॉलिक अॅसिड, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, जर मळलेले पीठ जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवले, तर त्याचे पोषक घटक नष्ट होतात आणि त्यात विषारी पदार्थ तयार होऊ लागतात. त्यामुळे ते खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, मळलेले पीठ फक्त 15 मिनिटांपर्यंतच ठेवावे आणि लगेच त्याचे पोळे किंवा रोट्या तयार करून खाव्यात. जर रेफ्रिजरेटरमध्ये (refrigerator)ठेवणे अपरिहार्य असेल, तर ते 1–2 तासांच्या आत वापरावे. तसेच, पीठ काळे दिसत असेल किंवा वास येत असेल, तर ते खाल्ले जाऊ नये.त्यामुळे रोजच्या आहारात आरोग्य टिकवायचे असेल, तर मळलेले पीठ ताजे वापरणेच सर्वोत्तम आहे, आणि जास्त वेळ साठवण्याची सवय टाळावी.

हेही वाचा :

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचा दरात मोठी घसरण
दिवसातून कितीवेळा कॉफी प्यावी? जाणून घ्या नाहीतर…
सीएनजी पुरवठा कधीपर्यंत सुरु होणार? MGL ने दिलं अपडेट…