आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीॉक्सिडंट्स असतात. जे पचनसंस्था सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. शिवाय त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही आवळा अधिक फायदेशीर ठरतो. डॉक्टर सुद्धा सरबत, आवळा(amla) पावडर अशा अनेक प्रकारात आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्हाला माहित आहे का आवळ्याचे सेवन सर्वांच्याच आरोग्यास फायदेशीर ठरत नाही. काही ठराविक व्यक्तींनी आवळ्याचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. याचे नेमके कारण काय? याबद्दल पुढे सविस्तर जाणून घेऊया.

एका रिसर्चमधून असे समोर आले आहे की, आवळ्यामध्ये असे काही नैसर्गिक पदार्थ असतात ज्यामुळे नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींना अॅलर्जी, खाज किंवा सूज अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेत काहीवेळा गंभीर आजार उद्भवण्याचीही शक्यता असते. आवळ्याचे सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते पण सर्वांसाठीच नाही. त्यामुळे कोणी कितीप्रमाणात आवळ्याचे सेवन करावे याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

आवळ्याचे(amla) सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे जर तुमच्याही रक्तातील साखरेची पातळी लवकर कमी होत असेल किंवा तुम्हाला सतत थकवा जाणवून चक्कर येणे यांसारख्या समस्या जाणवत असतील. तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आवळ्याचे सेवन करणे टाळावे. नाहीतर प्रकृती आणखी खराब होण्याची शक्यता असते. शिवाय ज्यांना सतत पोटाच्या समस्या असतात त्यांनी देखील आळ्याचे सेवन करणे टाळावे. कारण आवळा चवीला आंबट आणि त्यात अॅसिडिक गुणधर्म असतात. जे अॅसिडिटी, छातीत जळजळ होणे, पोटात सूज येणे, गॅस होणे किंवा पोट दुखी यांसारख्या समस्यांचे कारण बनू शकते. तसेच तुम्हाला आधीपासून अल्सर, गॅस्ट्राइटिस किंवा एसिड रिफ्लक्स अशा समस्या असतील तर, रिकामी पोटी आवळा खाणे प्रकर्षाने टाळावे.

याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी शरिरात ऑक्सालेट तयार करण्याचे कार्य करते. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला सु्द्धा किडनी संबंधित समस्या असतील तर आवळ्याचे सेवन टाळावे. विशेष म्हणजे गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात आवळ्याचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. तुम्हाला सुद्धा वरील समस्या जाणवत असतील तर, आवळ्याचे सेवन करताना किंवा आवळ्यापासून बनलेला कोणत्याही पदार्थाचे सेवन करताना आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच ही माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींसह नक्की शेअर करा.

हेही वाचा :

लाईव्ह शोमध्ये भारतीय तिरंगा फडकावणारा पाकिस्तानी रॅपर कोण?
चेन्नई सुपरकिंग्स IPL 2026 ऑक्शनमध्ये ‘या’ खेळाडूंवर लावणार मोठी बोली?
मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral