सकाळच्या नाश्त्यात(breakfast) प्रत्येकालाच काहींना काही स्पेशल हवं असत. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थांच्या सगळ्यांची इच्छा होते. जगभरात साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहे. या पदार्थांची चव कायमच जिभेवर रेंगाळते. इडली, डोसा, मेदुवडा, आप्पे इत्यादी अणे पदार्थ कायमच नाश्त्यात बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये साऊथ इंडियन स्टाईल बेन्ने डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

हा डोसा घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सकाळच्या नाश्त्यात कायमच बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. बेन्ने डोसा आणि खोबऱ्याची चटणी हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते. डोसा किंवा इडली बनवण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालावी लागते. पण बेन्ने डोसा बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजत घालण्याची कोणतीही आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया साऊथ इंडियन स्टाईल बेन्ने डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

रवा
बेसन
गव्हाचं पीठ
साखर
इनो
मीठ
तूप

कृती:

बेन्ने डोसा बनवण्यासाठी(breakfast) सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये रवा, दही, बेसन, गव्हाचे पीठ, मीठ आणि साखर घालून सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करा.त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून तयार केलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्या. यामुळे पिठात गुठळ्या राहणार नाहीत.तयार केलेले पीठ भांड्यात काढून त्यात इनो घाला आणि आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात पाणी घालू शकता. जास्त पाणी घालू नये, यामुळे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते.

डोसे कुरकुरीत होण्यासाठी पीठ काहीवेळा झाकण मारून बाजूला ठेवून द्या.बेन्ने डोसा बनवताना खूप जास्त तुपाचा वापर केला जातो. तवा गरम करून त्यावर भरपूर तूप घाला आणि तयार केलेले मिश्रण गोलाकार पसरवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.डोसाच्या वरच्या बाजूला बटर लावून वरून पोडी मसाला घालून डोसा फोल्ड करा आणि खोबऱ्याची चटणी, सांबारसोबत डोसा खाण्यासाठी सर्व्ह करा.तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला साऊथ इंडियन स्टाईल बेन्ने डोसा.

हेही वाचा :

अजित पवारांच्या नातेवाईकांना ₹5,000,000,000चं BMC रुग्णालय…
महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
गुड न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ कामासाठी मिळणार 10 दिवसांची पगारी रजा