बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते (actor)धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी अनेक बातम्या समोर येत आहेत. काहींनी त्यांची अवस्था गंभीर असल्याचा दावा केला आहे तर काहींनी त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले आहे पण नक्की खरं काय? याबाबत आता सर्वच चाहते संभ्रमात आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याला गमावण्याची इच्छा कुणाच्याच मनात नाही अशात त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेक चाहते हताश झाले. मात्र अलीकडेच धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून त्याच्या आरोग्यविषयीची नवीन अपडेट समोर आली आहे ज्यात त्यांनी निधनाच्या या बातम्यांना खोटं म्हणत त्यांची परिस्थिती आहे स्थिर असल्याचे म्हटले आहे.

धर्मेंद्र(actor) यांच्या निधनाच्या या बातम्या फक्त अफवा असल्याचे त्यांची पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल तसेच सनी देओल यांच्या टीमने स्पष्ट केले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून अजूनही इथे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात अलीकडेच हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात धर्मेंद्र यांच्यावर उपचार होत असल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र हे बेडवरुन आराम करत असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करताना दिसून आले.

धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा समोर येत असताना हा व्हिडिओ अनेकांना आता चिंतामुक्त करत आहे. व्हिडिओत दिसून येणाऱ्या दृश्यांवरून त्यांचे आरोग्य स्थिर असल्याचे समजते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, “सनी देओलच्या टीमने धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आणि देखरेखीखाली असल्याची पुष्टी केली आहे. ते सर्वांना खोट्या अफवा पसरवू नका, कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा अशी विनंती करतात”.

हेही वाचा :

तुमचा जुना फोन नंबर दुसऱ्याला गेल्यास धोका होऊ शकतो, सुरक्षेसाठी ‘हे’ उपाय जाणून घ्या
चांदीचे दागिणे, नाणे, भांड्यांवर कर्ज मिळणार, जाणून घ्या
वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता रिचा घोषच्या नावावर क्रिकेट स्टेडियम होणार