बिहार विधानसभा निवडणुकीत(elections)महिलांना मिळालेल्या सरसकट आर्थिक मदतीचा राजकीय समीकरणांवर किती मोठा प्रभाव पडू शकतो, याचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे. महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने 1500 रुपयांच्या मासिक मदतीमुळे संपूर्ण निवडणूक फिरवली, तर बिहारमध्ये त्याहून मोठी देणगी एकावेळी थेट 10,000 रुपये महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. निवडणुकीच्या तोंडावर ही रोख मदत मिळाल्याने महिलांचा कल निर्णायकपणे बदलला आणि विरोधकांचा ‘गेम’ पलटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बिहारमध्ये 29 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ’ अंतर्गत एकूण 1.5 कोटी महिलांना कोणत्याही परतफेडीच्या अटीशिवाय 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यापैकी तब्बल 75 लाख महिला या निवडणुकीच्या थोड्याच आधी DBTद्वारे या लाभात समाविष्ट झाल्या. त्यामुळे ही रक्कम निवडणुकीसाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

बिहार निवडणुकीत महिलांचे मतदान प्रमाण सर्वच गटांपेक्षा जास्त राहिले. अशावेळी थेट बँकेत जमा झालेल्या आर्थिक मदतीने महिलांमध्ये सरकारबद्दल प्रचंड अनुकूलता वाढल्याचे स्पष्ट दिसते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना स्वयंरोजगारासाठी ही मदत दिली गेल्याने त्यांच्यात सरकारविषयी विश्वास अधिक वाढला. लघुउद्योग, घरगुती उत्पादन, आणि सूक्ष्म व्यवसाय यांना या निधीतून चालना मिळाली. त्यामुळे महिलांना तात्काळ दिलासा तर मिळालाच, पण भविष्यासाठी सक्षम मार्गही उपलब्ध झाला. याशिवाय, या योजनेची घोषणा आणि अंमलबजावणी नेमकी निवडणुकीच्या काही आठवडे आधी झाल्याने तिचा थेट राजकीय फायदा मिळाला, असा विरोधकांचा आरोप असला तरी, या आर्थिक मदतीमुळे महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात बदलल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे महिलांच्या सक्षमीकरणावर सातत्याने भर देत आले आहेत. जीविका स्वयं-सहायता गट, पंचायत व नगरपालिका निवडणुकांतील 50% आरक्षण, महिलांसाठी प्रशिक्षण, मार्केटिंग सहाय्य, तसेच थेट आर्थिक लाभ अशा अनेक योजनांनी महिला मतदारांचा कल सरकारकडे वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. यामुळे महिलांमध्ये नीतीश कुमार यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे स्पष्ट दिसते.
महिलांचे मतदानाचे प्रमाण बिहारमध्ये (elections)पारंपरिकपणे जास्त असून, स्थिर प्रशासन आणि ठोस आर्थिक मदत देणाऱ्या सरकारांकडे महिलांचा कल राहतो. CMWES च्या 10,000 रुपयांच्या लाभाने हा कल आणखी मजबूत झाला असल्याचे परिणामांवरून दिसून येते.बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा 10 ऑक्टोबर 2025 रोजी झाली. त्यानंतर दोन टप्प्यात 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर मतदान पार पडले. निकाल आज 14 नोव्हेंबरला जाहीर झाले आणि महिलांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे एनडीएला सत्ता राखण्यात मोठी मदत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
योजनेची अंमलबजावणी निवडणुकीच्या दोन, अडीच महिन्यांपूर्वी सुरू झाली असली, तरी निवडणुकीच्या तोंडावर 75 लाख महिलांच्या खात्यात जमा झालेल्या 10,000 रुपयांची रोख मदत हा निवडणुकीतील सर्वात निर्णायक टप्पा ठरला. महाराष्ट्रात 1500 रुपयांच्या लाडकी बहीण योजनेने निवडणुकीचे सगळे गणित बदलले, तसेच बिहारमध्ये 10 हजारांच्या लाभाने महिला मतदारांची दिशा ठरवून टाकली.

हेही वाचा :
दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान कुलदीप यादव टीम इंडियाची साथ सोडणार
सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! काय आहेत आजचे दर
नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; ७ जणांचा मृत्यू