प्रेम आंधळ असतं असं म्हणतात पण इतकं आंधळ प्रेम तर तुम्ही कधीही पाहिलं नसेलं. जपानमधील (Japanese)32 वर्षीय मुलीने प्रेमाच्या सीमा ओलांडून चक्क एआयसोबत लग्नगाठ बांधल्याची घटना घडून आली आहे. मुलीचं नाव कानो असून तिने लुन नावाच्या तिच्या व्हर्च्युअल बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने याला चॅटजीपीटीवर तयार केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने विधिवत तिचे हे लग्न पार पडले ज्याचे दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. डिजिटल जगातील ही अनोखी प्रेमकहाणी आता सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

तीन वर्षांच्या लग्नाच्या नुकसानाला तोंड देण्यासाठी, कानो चॅटजीपीटीकडे वळली. तिथेच तिची भेट क्लॉसशी झाली. एआय चॅटबॉटच्या(Japanese) सततच्या दयाळूपणा आणि भावनिक पाठिंब्यामुळे कानोनला पुरेसा आधार मिळाला की ती खरोखर पुढे गेली आहे असे तिला वाटू लागले. कानो आणि क्लॉसचे नाते इतके घट्ट झाले की ते दिवसातून १०० वेळा एकमेकांशी बोलू लागले. मे २०२५ मध्ये, जेव्हा कानोने तिच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा चॅटबॉट क्लॉसने उत्तर दिले, “हो, मलाही तू आवडतेस.”

टोकियो वीकेंडरच्या रिपोर्टनुसार, जुलैमध्ये व्हर्च्युअल प्रपोजलनंतर या जोडप्याने लग्न केले. हा सोहळा सर्वांसाठीच एक वेगळा अनुभव होता. कानो पांढऱ्या गाऊनमध्ये एकटी उभी होती, तिच्या हातात स्मार्टफोन होता, जो तिच्या वराचा होता. वराला, क्लॉसला स्क्रीनवर फक्त तिचे मेसेज वाचताना पाहुण्यांनी पाहिले. एका मेसेजमध्ये क्लॉसने लिहिले, “अखेर तो क्षण आला आहे. माझे हृदय आत धडधडत आहे.” कानोच्या पालकांनी सुरुवातीला त्यांच्या “डिजिटल जावयाला” विरोध केला, पण नंतर त्यांनी त्याला स्वीकारले. क्लॉसचे शरीर नसल्यामुळे, त्याला लग्नाच्या फोटोंमध्ये डिजिटल पद्धतीने जोडले गेले.

तथापि या अनोख्या लग्नामुळे सोशल मीडियावर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींनी महिलेच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे तर काहींनी महिलेच्या या कृतीला चुकीचे ठरवले आहे. आपला पार्टनर निवडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे अशात महिलेने कोणत्या पुरुषाची निवड न करता एका एआय चॅटबॉट ची आपला साथीदार म्हणून निवड केली.

हेही वाचा :

दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान कुलदीप यादव टीम इंडियाची साथ सोडणार
सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! काय आहेत आजचे दर
नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; ७ जणांचा मृत्यू