गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी, हिरोगिरीसाठी धोकादायक स्टंट करणे सामान्य झाले आहे. शिवाय काहीजण घाईच्या नादात देखील आपला जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने चालु ट्रकखालून(truck) बाईक घातली आहे. याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मोठी रहदारी सुरु आहे. ट्राफिक जाम झाले असून मोठे ट्रक, गाड्या उभ्या आहेत. याच वेळी एक बाईकस्वार ट्रकखालून जाण्याचा प्रयत्न करत आहे. तरुण घाईत असल्याने त्याने ट्रकखालून गाडी घातली आहे. गाडी ट्रक(truck) खालून घालताना त्याला बाहेर निघणे कठीण जात आहे. पण तो कसातरी बाहेर निघतो. पण तरुणाचा हा स्टंट पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. पण त्याचा चुकूनही ट्रक चालकाने ट्रक चालवला असता, तर यामुळे त्याचा जीवही गेला असता.

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sanki_kemar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांना पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत हे अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने पत्रकार असूनही एवढी मोठी चूक, लोक काय शिकणार यांच्याकडून असे म्हटले आहे. या तरुणाच्या गाडीवर प्रेस लिहिले असल्याने अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तर दुसऱ्या एकाने नशीब चांगले होते म्हणून वाचला, नाहीतर फोटांवर हार चढला असता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

Women Cricket World Cup विजयानंतर केंद्रीय करारांमध्ये होणार सुधारणा
गुगलच्या नवीन पिक्सेल 10 वर मिळत आहे 11 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट
करिश्मा कपूरच्या मुलांची फी दोन महिन्यांपासून थकली, थेट कोर्टात अर्ज, अमेरिकेतील विद्यापीठात..