अलिकडेचे भारतीय महिला क्रिकेट (cricket)संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या कामगिरीने भारतीय महिला संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता भारतीय पुरुष संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यातील वेतनाबाबत विषमता आता समानतेत बदलत आहे. लोकांचा ओढा आता महिला क्रिकेटकडे देखील दिसून येत आहे. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की पुरुष आणि महिला खेळाडूंमधील केंद्रीय करारांमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण फरकाबद्दल तिला कधीही अडचण आली नाही, कारण ही तफावत नेहमीच बाजारातील मागणीमुळे निर्माण झाली आहे. तथापि, महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर ही तफावत निश्चितच कमी होणार असल्याचा कौरचा विश्वास आहे.

बीसीसीआयने २०२२ मध्ये महिला खेळाडूंच्या मॅच फीची पुरुष खेळाडूंशी बरोबरी केली आहे, परंतु वार्षिक केंद्रीय करारांमध्ये अजून देखील लक्षणीय फरक दिसून येतो. पुरुष खेळाडूंना टॉप डिव्हिजनमध्ये ₹७ कोटी (७० दशलक्ष रुपये) मिळतात, तर महिलांना ₹५ दशलक्ष (५ दशलक्ष रुपये) मिळतात.हरमनप्रीत कौरने पीटीआयला सांगितले की २०१७ च्या विश्वचषकानंतर महिला क्रिकेटमध्ये मोठे परिवर्तन घडले आहे. जेव्हा त्यांचे केंद्रीय करार ₹१.५ दशलक्ष (१.५ दशलक्ष रुपये) वरून ₹५ दशलक्ष (५ दशलक्ष रुपये) करण्यात आले. ती म्हणाली की जर महिला संघाने विशेषतः आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली तर पेमेंट स्ट्रक्चरमध्ये आणखी सुधारणा होणार.
हरमनप्रीत कौरने हे देखील मान्य केले की, बऱ्याच काळापासून क्रिकेटमधील बहुतेक उत्पन्न पुरुष संघाकडून येत होते, परंतु या वर्षी विश्वचषक जिंकल्यानंतर महिला क्रिकेटचे बाजारमूल्य देखील झपाट्याने वाढले आहे. कौर म्हणाली की, २ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरी जिंकल्यानंतर महिला क्रिकेटचे बाजारमूल्यात लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. ट्रॉफी जिंकून आम्ही सिद्ध करून दाखवले की, आम्ही देखील समान दावेदार आहोत.
कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले की जेव्हा महिला खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत राहतील आणि अधिका अधिक ट्रॉफी जिंकतील तेव्हाच बदल घडणार आहे. तरच महिला क्रिकेटला (cricket)पुरुष संघाइतकेच महत्त्व मिळेल. भविष्यातील योजनांबद्दल सांगताना हरमनप्रीत कौर म्हणाली की, भारतात आता वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंचा एक मजबूत असा समूह आहे. कौरने क्रांती गौर आणि श्री चरणी सारख्या तरुण खेळाडूंचे कौतुक करत म्हटले की, या खेळाडूंनी दबावाखाली देखील आपली उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली.
हरमनप्रीत कौरने बीसीसीआय सचिव आणि सध्याचे आयसीसी अध्यक्ष जय शाह यांचे देखील कौतुक केले आहे. हरमनप्रीत म्हणाली की जय शाहने नेहमीच महिला क्रिकेटला पाठिंबा दर्शवला आहे. मग आपण ट्रॉफी जिंकू किंवा न जिंकू. मॅच फी समान करणे आणि महिला प्रीमियर लीग सुरू करणे हे त्यांचे महत्वाचे उपक्रम होते. शेवटी, हरमनप्रीत कौरने सांगितले की, तिचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. आणखी एक विश्वचषक जिंकणे बाकी असून आमचे पुढील ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही अधिक मेहनत करू. असे कौरने म्हटले आहे.

हेही वाचा :
करिश्मा कपूरच्या मुलांची फी दोन महिन्यांपासून थकली, थेट कोर्टात अर्ज, अमेरिकेतील विद्यापीठात..
२०२६ मध्ये सोन्याच्या किंमती काय असणार; आकडेवारी आली समोर
बिहार जिंकताच भाजपाने आपल्याच ज्येष्ठ नेत्याला पक्षातून हाकललं