बिहारमधील निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने दुसऱ्याच दिवशी राज्यातील बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पक्षविरोधी कारवायांसाठी जबाबदार धरत तीन नेत्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये बिहारमधील ज्येष्ठ राजकारणी आणि माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांचा समावेश आहे. पक्षाच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या इतर दोन नेत्यांमध्ये विधान परिषद सदस्य अशोक अग्रवाल आणि कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांचा समावेश आहे.बिहार भाजपचे राज्य मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी शनिवारी सकाळी संबधित नेत्यांना(leader)नोटीस बजावली, त्यांना त्यांच्या निलंबनाची माहिती दिली आणि त्यांना पक्षातून का काढून टाकू नये याचे स्पष्टीकरण देण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे.

“तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात. हे शिस्तीच्या कक्षेत येते. पक्षाने हे गांभीर्याने घेतले आहे. यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. म्हणून, तुम्हाला पक्षातून निलंबित केलं जात आहे आणि तुम्हाला पक्षातून(leader) का काढून टाकू नये याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं जात आहे. कृपया हे पत्र मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत तुमची भूमिका स्पष्ट करा,” असं सिंह आणि अग्रवाल यांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीत लिहिण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निलंबन ही केवळ एक प्रक्रिया आहे आणि अखेर त्यांना पक्षातून काढून टाकलं जाईल. बिहारमधील आरा येथील माजी खासदार असलेले सिंह 2024 च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून भाजपा आणि सरकारवर टीका करत होते. ते एनडीए नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते आणि बिहार सरकारवर गंभीर आरोप करत होते.
माजी राजनयिक असलेले सिंह हे मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात गृहसचिव होते. ते 2013 मध्ये भाजपमध्ये सामील झाले. 2014 आणि 2019 मध्ये दोनदा आरा येथून खासदार झाले. 2017 मध्ये त्यांना मोदी 1.0 मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा :
1 डिसेंबरपासून बंद होणार SBI ची ही प्रसिद्ध सेवा
कसोटी क्रिकेटमध्ये हा क्रिकेटर बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’,
१८ नोव्हेंबरनंतर लाडकी बहिण योजना होणार बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य