OnePlus 15 भारतात 13 नोव्हेंबर म्हणजेच उद्या लाँच(launch) होणार आहे, ज्याची पुष्टी कंपनीने स्वतः केली आहे.यात एक पॉवरफूल क्वालकॉम प्रोसेसर आणि अनेक चांगले फीचर्स असतील. कंपनीने अधिकृतपणे काही फीचर्स उघड केले आहेत आणि हा हँडसेट आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. OnePlus 15 मध्ये Qualcomm ची सर्वात शक्तिशाली चिपसेट Snapdragon 8 Elite Gen 5 (3 nm) वापरला जाईल. तसेच, या हँडसेटमध्ये 7300mAh बॅटरी दिली जाईल. OnePlus India ने पोस्ट शेअर करत या फीचर्सची पुष्टी केली आहे. हा स्मार्टफोन उद्या संध्याकाळी 7 वाजता लाँच केला जाईल.

OnePlus 15 चीनमध्ये लाँच(launch) झाला आहे. या हँडसेटमध्ये 6.78-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass Victus 2 वापरला आहे. OnePlus 15 मध्ये क्वालकॉमची सर्वात पॉवरफूल चिपसेट असेल. यासोबत 12GB आणि 16GB RAM मिळेल. 1TB पर्यंत स्टोरेजसह असेल.
OnePlus 15 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तिन्ही कॅमेऱ्यात 50MP चा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.OnePlus 15 ची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला आहे की त्याची सुरुवातीची किंमत 72 हजार 999 असेल. तथापि, कंपनीने अद्याप या किंमतीची पुष्टी केलेली नाही.

हेही वाचा :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…
ट्रम्पच्या निर्बंधांमुळे भारताचा मोठा निर्णय…
Amazon वर मिळतेय मोटोरोलाच्या ‘या’ जबरदस्त मोबाईलवर मोठी सूट