पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज(sports world) नसीम शाहच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या संबंधित 5 संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. सदर घटना ही ९ नोव्हेंबर रोजी घडली असून यावेळी लोअर दिरमधील मयार येथील नसीम शाह यांच्या घराच्या मुख्य गेटवर गोळीबार करण्यात आला. मुख्य गेट, खिडकी आणि जवळच उभ्या असलेल्या कारवरही बेछूट गोळीबार करण्यात आला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी न्यूज एजेंसीने सांगितल्यानुसार, ‘अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तान क्रिकेट(sports world) संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या घरावर गोळीबार केला. त्याच्या घराच्या मुख्य दरवाजावर, खिडकी आणि पार्क केलेल्या कारलाही या गोळ्या लागल्या. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे असून या संदर्भातील तपास सुरू आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते की गोळ्यांच्या प्रभावामुळे लोखंडाच्या मुख्य गेटवर अनेक छिद्र पडले. तर दुसरीकडे तेथे उभा असलेल्या काळ्या रंगाच्या गाडीला देखील गोळीबारामुळे छिद्र पडली. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार, पोलिस तिथे पोहोचेपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संशयितांची चौकशी सुरू असून हल्ल्यामागील कारण लवकरच स्पष्ट होईल. नसीम शाह शाह हा पाकिस्तानी क्रिकेट संघातील एक प्रमुख गोलंदाज असून 2019 मध्ये त्याने पाकिस्तान संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा :

समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर….
‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…