राजधानी दिल्ली आज सकाळी झालेल्या स्फोटांच्या मालिकेने (match)हादरली असून संपूर्ण देशभरात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी घातपाती हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटांमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींची परिस्थिती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ला परिसरात तीन गाड्या स्फोटानंतर पेट घेत जळून खाक झाल्या आहेत. घटनेनंतर दिल्लीसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या स्फोटाच्या घटनास्थळापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली विरुद्ध जम्मू काश्मीर रणजी ट्रॉफी सामना(match) सुरू होता. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मैदानात उपस्थित असल्याने सामना रद्द करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने दिल्ली पोलिसांनी मैदान परिसरात तातडीने अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे.
सामन्यात जम्मू काश्मीरने पहिल्या डावात 310 धावा करून 99 धावांची आघाडी घेतली होती, तर दिल्लीने दुसऱ्या डावात 277 धावा करून जम्मू काश्मीरसमोर 178 धावांचे आव्हान ठेवले आहे. दुसऱ्या डावात जम्मू काश्मीरने 2 गडी गमावून 55 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अजून 124 धावा आवश्यक आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत सामन्याचा निकाल सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित ठेवला जाण्याची शक्यता आहे.
याचवेळी, दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला असून 14 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसह वनडे मालिका देखील ठरलेली आहे. पहिला कसोटी सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर, तर दुसरा गुवाहाटीच्या बारसापरा मैदानात होणार आहे. सध्याच्या घटनाक्रमानुसार, या मालिकेदरम्यान सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवली जाणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.स्फोटानंतर दिल्लीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा दल आणि दहशतवादविरोधी पथकांनी तपास सुरू केला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी घटनेचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :
आता पाकिस्तानची वाटचाल लष्कराच्या राजवटीकडे…..?
दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर
महानगरपालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता!