कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
एकही युद्ध न जिंकलेल्या, किंबहुना पराभूतच झालेल्यालष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फिल्डमार्शलचा दर्जा देण्यात आला आणि आतात्यांचे पद हे घटनात्मक आणि राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरीचे करण्याचे प्रयत्न पाकिस्तानच्या(Pakistan) राष्ट्रीय असेंबलीमध्येघटनादुरुस्तीच्या माध्यमातून सुरू आहेत. तसे झाले तर युद्ध घोषित करण्याचे आणि अणु अस्त्र वापरण्याचे पूर्ण अधिकार लष्कर प्रमुखांच्याकडे जाणार आहेत. घटनादुरुस्तीच्या माध्यमातून पाकिस्तानची वाटचाल आता अप्रत्यक्षपणे लष्कराच्या राजवटीकडे सुरू झाली असल्याचे समजले जाते. पाकिस्तानच्या अंतर्गत सुरू असलेल्या हालचाली किंवा घडामोडी या भारतासाठी चिंता वाढवणाऱ्या आहेत.नुकत्याच झालेल्या भारताबरोबरच्या अघोषित युद्धामध्ये पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतरअवघ्या काही दिवसात लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फिल्डमार्शलचा दर्जा देण्यात आला.

एखाद्या पराभूत लष्कर प्रमुखाला अशा पद्धतीने पदोन्नती देण्याचा जगातील हा पहिलाच प्रकार म्हणावा लागेल. असीम मुनीर यांनाव्हाईट हाऊस मध्ये मेजवानीचे निमंत्रण देऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीशिष्टाचाराच्या नियमावलीचा भंग केला. आणि त्यातून मुनीर यांचे महत्त्व पाकिस्तानच्या(Pakistan) राजकारणात आणि सत्ताकारणात वाढले.ट्रम्प यांच्या या विक्षिप्त कृतीबद्दल भारताने तेव्हा नाराजी व्यक्त केली होती.लष्कर प्रमुख असीममुनीर यांच्याकडून आपली सत्ता काढून घेतली जाऊ शकते या भीतीपोटी पाकचे पंतप्रधान शहाबाद शरीफयांनी चक्क त्यांचा अनुनय सुरू केला. त्यांना फिल्ड मार्शल अशी पदोन्नती दिली.इतकेच नाही तर सत्ता राबवताना त्यांना अतिशय महत्त्व दिले जाऊ लागले होते. आता तर घटनादुरुस्ती करून त्यांना अमर्याद अधिकार दिले जाणार आहेत. त्यांना पदावरून हटवावयाचे असेल तर त्यांच्यावर महाअभियोग चालवावा लागेल किंवा दोन तृतीयांशमताधिक्याने त्यांना हटवावे लागेल. अणू चाचणी घेणे आणि अणु हल्ले करणेयाचे अधिकारही त्यांना दिले जाणार आहेत.
पाकिस्तानच्या गेल्या 75 वर्षाच्या इतिहासात लष्कर प्रमुखाला इतके महत्त्व दिले गेले नव्हते. असीम मुनीर यांचे अधिकार वाढवणे हे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचे हतबलतेचे लक्षण आहे.पाकिस्तान मध्ये सध्या अति प्रचंड महागाई आहे. जगायचे कसे हा मोठा प्रश्न तेथील जनतेला पडलेला आहे. भारतामध्ये 40 रुपये प्रति किलो गहू उपलब्ध आहे तर पाकिस्तान मध्ये गव्हाचा प्रत्येक किलोचा दर चारशे रुपये आहे. या एका उदाहरणावरून तेथील महागाई किती प्रचंड आहे हे लक्षात येऊ शकेल. याशिवाय दहशतवादी संघटनांनी उच्छाद मांडला आहे. पाक व्याप्त काश्मीर मध्ये सर्वसामान्य जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. बलुचिस्तान ने तर स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले सुरू केले आहेत.
पख्तुनप्रांतात फुटीरतेची चळवळ सुरू आहे. पाकिस्तान मधील तीन महत्त्वाच्या प्रांतात अराजक सदृश्य स्थिती आहे.सिंध प्रांतही अस्वस्थ आहे.त्यातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सदृश्य वातावरण आहे. एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. शस्त्रसंधी दोन्ही बाजूंनी मोडीत काढली आहे.अशा प्रकारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जात असलेल्या पाकिस्तानसमोरआर्थिक संकट मोठे आहे. देशाची गंगाजळी काही दिवस पुरेल इतकी आहे. हा देश जवळपास भिके कंगाल झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही अटी घालूनकर्ज दिले आहे. पण या कर्जातील बहुतांशी हिस्सा आधीच्या कर्जाचे व्याज भरण्यावरच खर्च झाला आहे.
कोणत्याही देशात अशा प्रकारची आर्थिक आणीबाणी येते तेव्हा तो देश एकसंघ रहात नाही. त्याचे विघटन होते किंवा अंतर्गत प्रांत हे स्वतःला स्वतंत्र घोषित करतात. सध्या पाकिस्तानचीलष्कराच्या राजवटीकडे वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे तो फुटीरतेच्या दिशेने जात असल्याचे संकेतमिळताना दिसतात.स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाल्याच्या दिवसापासून त्या देशात अस्थिरता आहे. या देशात लोकशाही प्रक्रियेतून सत्तेवरआलेल्या सरकारलातेथील लष्कराने नीटपणे काम करू दिलेले नाही. उलट संधी मिळेल तेव्हा लष्कर प्रमुखांनी तेथील सत्ता आपल्या हाती घेतलेली दिसते. आताही लष्कर प्रमुखांनी उठाव करून सत्ता काबीज करण्याची गरज नाही. कारण राष्ट्र प्रमुखा इतकेचअधिकार लष्कर प्रमुखांना मिळणार आहेत.एक प्रकारे तेथील सरकार कडून लष्कर प्रमुखांना रेड कार्पेट अंथरले जात आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा :
दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर
महानगरपालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता!
दिल्लीतील स्फोट पूर्वनियोजितच; फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर…