हिवाळी अधिवेशन, ग्रामपंचायत जिल्हापरिषद निवडणुका(elections) आणि परीक्षा काळामुळे विलंब अपरिहार्य राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता अधिकच स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाने दोन डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका जाहीर केल्या असून, त्या निवडणुकांनंतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे तत्काळ महानगरपालिका निवडणुका घेण्याची शक्यता अल्प आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनादरम्यान कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा किंवा प्रक्रिया सुरू करणे प्रचलित नाही. अधिवेशन साधारणतः १९ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

अधिवेशनानंतर राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे वळणार आहे. अनेक जिल्ह्यांतील स्थानिक संस्थांचा कार्यकाळ संपल्याने या निवडणुका(elections) प्राधान्याने घेणे आवश्यक ठरणार आहे. यानंतर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीपासून शैक्षणिक परीक्षा काळ सुरू होईल. फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने शाळा, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी निवडणूक कामासाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत.

या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुका फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल किंवा मे २०२६ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयोगाकडून तातडीची हालचाल सुरू नसल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याचा अंदाज अधिकच बळावला आहे.

राजकीय पक्ष मात्र निवडणुकीसाठी सज्जतेच्या हालचाली सुरूच ठेवत असून, उमेदवार निश्चिती, स्थानिक आघाड्या आणि प्रचारयंत्रणा यावर पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत. दरम्यान, आयोगाकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर होईपर्यंत राजकीय वातावरणात तर्कवितर्क सुरू राहणार आहेत.हिवाळी अधिवेशन, ग्रामपंचायत निवडणुका आणि परीक्षा काळ यामुळे महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांसाठी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता प्रबळ.

हेही वाचा :

दिल्लीतील स्फोट पूर्वनियोजितच; फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर…
स्टार क्रिकेटरच्या घरावर जबरदस्त गोळीबार, व्हायरल Video मुळे क्रीडा विश्वात खळबळ
फक्त 3 दिवस बाकी, 5 राशींचं भाग्य उजळणार!