भारत आणि अमेरिकेतील व्यापारसंबंधांमध्ये गेल्या काही दिवसांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने भारतावर मोठे टॅरिफ लावल्याने दोन्ही देशांमधील आर्थिक तणाव अधिकच वाढला आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली असून, अमेरिकन कंपन्यांनी (companies)राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या मोठ्या शुल्काचा विस्तार करण्याची मागणी केली आहे. ही मागणी भारतासाठी तसेच चीनसाठी अत्यंत चिंताजनक ठरू शकते, कारण या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

वृत्तानुसार, अमेरिकेतील स्टील उद्योगाशी संबंधित तब्बल ७०० नवीन वस्तूंना टॅरिफच्या यादीत सामील करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. यामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या अनेक उत्पादनांवर अधिक शुल्क लादले जाऊ शकते. या वाढीव शुल्कामुळे भारतीय उत्पादकांना अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करणे अधिक कठीण होईल.अमेरिकेतील अनेक कंपन्यांचे म्हणणे आहे की, परदेशी वस्तूंच्या मोठ्या पुरवठ्यामुळे त्यांच्या देशांतर्गत उद्योगांना मोठे नुकसान होत आहे. उदाहरणार्थ, गार्डियन बाइक्स या अमेरिकन सायकल कंपनीने वाणिज्य सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “परदेशातून येणाऱ्या स्वस्त सायकलींमुळे आमचा उद्योग संपला आहे.”
या कंपनीप्रमाणेच इतरही अनेक अमेरिकन उत्पादक कंपन्या(companies) सरकारकडे संरक्षणाची मागणी करत आहेत आणि टॅरिफ वाढवण्याची मागणी पुढे करत आहेत.गेल्या ऑगस्ट महिन्यातच अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियम डेरिव्हेटिव्ह उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत शुल्क लादले होते. मात्र, आता कंपन्या ही यादी आणखी विस्तारित करण्याची मागणी करत आहेत. जर हा निर्णय अमलात आणला गेला, तर भारत, चीन आणि इतर निर्यात-आधारित अर्थव्यवस्थांवर त्याचा गंभीर परिणाम होईल.
सध्या भारत आणि चीन हे दोन्ही देश अमेरिकन बाजारपेठेतील उपस्थिती टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा स्थितीत अमेरिकन कंपन्यांकडून होत असलेली ही टॅरिफ वाढीची मागणी त्यांच्या निर्यातीसाठी मोठा धक्का ठरू शकते. त्यामुळे भारतासाठी हा आगामी काळ आर्थिक आणि धोरणात्मक दृष्ट्या आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :
समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर….
‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…