भारताच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा (Chicken’s Neck) सिलीगुडी कॉरिडोर, म्हणजेच ‘चिकन्स नेक’, पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताच्या मुख्य भूमीला ईशान्येकडील सात राज्यांशी जोडणारा हा केवळ २२ ते २४ किलोमीटर रुंद भूभाग देशाच्या एकात्मतेसाठी निर्णायक मानला जातो. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या या पट्ट्यावर चीनची वाढती नजर, तसेच बांग्लादेशातील युनूस सरकारच्या काळात झालेली वक्तव्ये लक्षात घेता, भारताने या भागातील कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षेला अधिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर सिलीगुडी कॉरिडोरमध्ये (Chicken’s Neck) अंडरग्राऊंड रेल्वे कॉरिडोर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव समोर आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी या योजनेची माहिती देताना सांगितले की, पश्चिम बंगालमधील चिकन्स नेकच्या उत्तर भागात हा अंडरग्राऊंड रेल्वे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीतही सुरक्षित आणि अखंड वाहतूक सुरू राहावी, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या माध्यमातून हा अंडरग्राऊंड कॉरिडोर विकसित करण्यात येणार असून (Chicken’s Neck) प्रस्तावित मार्ग टिन माइल हाटपासून रंगापानी आणि पुढे बागडोगरा पर्यंत जाणार आहे. सिलीगुडी कॉरिडोर हा नेपाळ, भूतान आणि बांग्लादेश या तीन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या अगदी जवळ असल्याने येथे सुरक्षेची आव्हाने कायम असतात. याशिवाय पूर, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कनेक्टिव्हिटी खंडित होण्याचा धोका असतो. हे धोके कमी करण्यासाठी अंडरग्राऊंड रेल्वे हा अधिक सुरक्षित पर्याय मानला जात आहे.

या बोगदा रेल्वेमुळे एक असा (Chicken’s Neck) पर्यायी आणि न दिसणारा सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे गरजेच्या वेळी सुरक्षा दल, लष्करी सामग्री तसेच आपत्कालीन पुरवठ्याची वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय करता येईल. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, हा प्रकल्प बागडोगरा एअर फोर्स स्टेशन आणि भारतीय सेनेच्या ३३ व्या कोरच्या बेंगडुबी आर्मी कँटोनमेंटजवळ असल्यामुळे एअर-रेल लॉजिस्टिक्सला मोठा आधार मिळणार आहे.

दार्जिलिंग जिल्ह्यातील टिन माइल हाट ते रंगापानी या मार्गाची निवड हीही रणनीतीपूर्वक (Chicken’s Neck) करण्यात आली आहे. टिन माइल हाट हे सिलीगुडीपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असून बांग्लादेशच्या पंचगढपासून अवघ्या ६८ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या भागातील कनेक्टिव्हिटी सुरक्षित ठेवणे भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. सिलीगुडी कॉरिडोरची सुरक्षितता, अखंड दळणवळण आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळ देणारा हा अंडरग्राऊंड रेल्वे प्रकल्प भविष्यात भारतासाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी