सचिन तेंडुलकर हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके (centuries)करणारा भारतीय फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५ कसोटी सामन्यांमध्ये ४५ डावात सात शतके केली आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४२.४६ च्या सरासरीने १७४१ धावा केल्या आहेत.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीयांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १५ सामन्यांमध्ये २६ डावात पाच शतके केली.

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन चार शतकांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फक्त ११ सामने खेळले, परंतु त्याची कामगिरी प्रभावी होती.विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत, पण ते निवृत्त झाले आहेत. अजिंक्य रहाणेनेही या संघाविरुद्ध तीन शतके झळकावली आहेत, पण तोही संघाचा भाग नाही.

सध्याच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, सलामीवीर केएल राहुल सात सामन्यांमध्ये दोन शतकांसह(centuries) यादीत सातव्या स्थानावर आहे. जर त्याने या दोन सामन्यांच्या मालिकेत एक शतक केले तर तो रोहित आणि कोहलीची बरोबरी करेल, तर दोन शतकांमुळे तो अझरुद्दीनसह तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

हेही वाचा :

इचलकरंजी मधील शहापूर येथे पाव किलो गांजा जप्त…
पुढच्या 48 तासांत या राशींचं नशीब पालटणार…
जुनी कार विकताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा येऊ शकते मोठी अडचण!