ऑस्ट्रेलिया दौरा संपून अनेक दिवस उलटून गेले असले तरी टीम इंडियाचे(Team India) दोन दिग्गज खेळाडू — विराट कोहली आणि रोहित शर्मा — यांच्या भविष्यासंदर्भात अजूनही अनिश्चितता कायम आहे. टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर हे दोघेही सध्या केवळ वनडे स्वरूपात दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी वनडे मालिकेत पुनरागमन केले असले तरी, भारतीय संघातील त्यांचे स्थान अजूनही ठाम झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेतल्याशिवाय त्यांना टीम इंडियात स्थान मिळणार नाही.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, बीसीसीआयने विराट आणि रोहितला 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत खेळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी ही अट लागू नसली तरी, 11 जानेवारी 2026 पासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी निवड व्हावी, असे वाटत असेल तर दोघांनाही ही अट पूर्ण करावी लागणार आहे.

दरम्यान, रोहित शर्माने देशांतर्गत क्रिकेट(Team India) खेळण्याची इच्छा आधीच व्यक्त केली आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला त्याबाबत कळवले आहे. तो केवळ विजय हजारे ट्रॉफीतच नव्हे, तर 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्येही सहभागी होऊ शकतो. दुसरीकडे, विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी खेळेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेनंतर वनडे मालिकाही नियोजित आहे, परंतु विराट आणि रोहित सध्या विश्रांतीवर आहेत. त्यामुळे, त्यांच्या पुनरागमनासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करणे हेच त्यांच्यासमोरचं नवं आव्हान ठरणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे, वरिष्ठ खेळाडूंनाही स्थान मिळवण्यासाठी स्पर्धात्मक क्रिकेट खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे, ज्यामुळे आगामी काळात टीम इंडियाच्या निवडीमध्ये नव्या निकषांचा प्रभाव स्पष्टपणे दिसू शकतो.

हेही वाचा :

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आयुष्यातील शेवटच्या लढाईतून घरी परतला He-Man
सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय, हे 3 दिग्गज कोहली आणि रोहितपेक्षा पुढे…
देशावर दुहेरी संकट! पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे