गाडी विकणे ही केवळ पैसे आणि चावी बदलण्याची गोष्ट नाही, तर ती एक पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, नंतर तुम्हाला वाहतूक दंड, अपघात प्रकरणे किंवा कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. अलीकडेच दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात वापरलेली गाडी(car) अनेक वेळा विक्री-विकत झाली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा जुनी गाडी विकताना नियमांचं पालन करणं का महत्त्वाचं आहे, हे अधोरेखित झालं आहे. आरटीओ प्रत्येक वाहनाच्या मालकाची आणि व्यवहाराची नोंद ठेवतो. त्यामुळे चुकीच्या व्यवहारामुळे तुम्हालाच जबाबदार धरलं जाऊ शकतं.

जुनी गाडी विकताना सर्वात आधी कागदपत्रांची पूर्तता करा. फक्त तोंडी करार किंवा विश्वासावर गाडी विकू नका. विक्रीच्या वेळी दोन्ही पक्षांनी Form 29 आणि Form 30 हे आरटीओचे फॉर्म भरून स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. हे फॉर्म वाहनाची मालकी अधिकृतपणे दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असतात.त्यानंतर, खरेदीदाराची ओळख पडताळा करणे अत्यावश्यक आहे. त्याच्याकडे वैध आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पत्त्याचा पुरावा आहे का, हे तपासा. हे पुढे कोणत्याही गैरवापराच्या प्रकरणात तुमचं रक्षण करेल.
वाहन विकल्यानंतर डिलिव्हरी पावती घेणे विसरू नका. या पावतीत स्पष्टपणे नमूद असावे की गाडी(car) अमुक तारखेला आणि वेळेला खरेदीदाराकडे सुपूर्त करण्यात आली आहे. दोघांनीही या दस्तऐवरावर स्वाक्षरी करावी. हे कागद भविष्यात तुमच्यासाठी कायदेशीर संरक्षण ठरू शकतात.तसेच, वाहन विकल्यानंतरही तुमची जबाबदारी संपत नाही. तुम्ही आरटीओकडे ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, हे ट्रॅक केले पाहिजे. काही वेळा खरेदीदार विलंब करतात आणि वाहन जुन्या मालकाच्या नावावर राहते. अशावेळी कोणताही गुन्हा किंवा वाहतूक दंड झाला तर नोटीस तुमच्याच नावावर येऊ शकते.
तुमच्या विमा कंपनीला सुद्धा या बदलाबद्दल कळवा. वाहन विक्रीची माहिती दिल्यानंतर पॉलिसी रद्द करता येते किंवा No Claim Bonus नव्या वाहनासाठी ट्रान्सफर करता येतो. हा बोनस तुम्हाला भविष्यातील विमा प्रीमियमवर सूट देऊ शकतो.

हेही वाचा :
‘या’ क्रिकेटरला सख्ख्या मुलाप्रमाणे मानतात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी सारखंच करतात प्रेम
Maruti E-Vitara ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्यास सज्ज
गौतमी पाटील ‘नऊवारी’ गाण्यात प्रथमच दिसली रणरागिणीच्या भूमिकेत, गाणे तुफान व्हायरल