Vivo X300 Pro आणि Vivo X300 हे दोन्ही स्मार्टफोन(Smartphones) ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे लाँचिंग Vivo X300 सीरीज चीनमध्ये डेब्यू केल्यानंतर दोन आठवड्यांनी करण्यात आले आहे. हे दोन्ही फोन फ्लॅगशिप 3nm ऑक्टा कोर MediaTek Dimensity 9500 चिपसेटवर आधारित आहे. अलिकडच्या अहवालांनुसार, Vivo X300 सीरीज डिसेंबरच्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकते.

Vivo X300 सीरीजची किंमत आणि उपलब्धता
Vivo X300 Pro स्मार्टफोनच्या(Smartphones) 16GB रॅम+ 512GB स्टोरेजवाल्या व्हेरिअंटची किंमत EUR 1,399 म्हणजेच सुमारे 1,43,000 रुपये आहे. Vivo X300 स्मार्टफोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत EUR 1,049 म्हणजेच सुमारे 1,08,000 रुपये आहे. तर 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत EUR 1,099 म्हणजेच सुमारे 1,13,000 रुपये आहे. Vivo X300 सीरीजमधील दोन्ही फोन युरोपमध्ये कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे 3 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. Vivo X300 Pro ड्यून ब्राउन आणि फॅंटम ब्लॅक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, तर Vivo X300 हॅलो पिंक आणि फँटम ब्लॅक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

Vivo X300 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Vivo X300 Pro डुअल-सिम फोन आहे, जो Android 16-बेस्ड OriginOS 6 सह येतो. यामध्ये 6.78-इंच 1,260×2,800 पिक्सेल फ्लॅट Q10+ LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट पर्यंत, 300Hz टच सँम्पलिंग रेट, 1.07 बिलियन कलर्स आणि 452ppi पिक्सेल डेनसिटी आहे. स्क्रीन P3 कलर गॅमट आणि HDR सपोर्ट करतो आणि स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 94.85% आहे.

फ्लॅगशिप Vivo X300 Pro ला ऑक्टा कोर 3nm MediaTek Dimensity 9500 चिपने सुसज्ज केले आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 4.21GHz आहे. हा प्रोसेसर Mali G1-Ultra GPU, 16GB पर्यंत LPDDR5X Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह येतो. यामध्ये V3+ इमेजिंग चिप देखील देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Vivo X300 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.57) प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल (f/2.67) पेरिस्कोप कॅमेरा आहे, ज्यामध्ये 100x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट देण्यात आला आहे. फ्रंटला 50-मेगापिक्सेल (f/2.0) सेल्फी कॅमेरा होल-पंच कटआउटमध्ये दिला आहे. रियर कॅमेरा सेटअप 8K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

ऑनबोर्ड सेंसर्समध्ये 3D अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, लेजर ऑटोफोकस सेंसर, हॉल इफेक्ट सेंसर, IR ब्लास्टर, फ्लिकर सेंसर आणि मल्टीस्पेक्ट्रल सेंसर यांचा समावेश आहे. Vivo X300 Pro मध्ये वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी 3.2 जनरेशन 1 टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनमध्ये 5,440mAh बॅटरी दिली आहे. ज्यामध्ये 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये डुअल-स्पीकर सेटअप, एक्स-ऐक्सिस लीनियर मोटर, एक्शन बटन आणि सिग्नल एम्प्लिफायर चिप दिली आहे. हा फोन IP68 रेटेड आहे. याचा आकार 161.98×75.48×7.99mm आणि वजन सुमारे 226 ग्रॅम आहे.

Vivo X300 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
वॅनिला मॉडल Vivo X300 मध्ये देखील तीच चिप, ओएस, कनेक्टिविटी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत, जे प्रो व्हेरिअंटमध्ये आहेत. या फोनमध्ये 6.31-इंच 1,216×2,640 पिक्सेल फ्लॅट Q10+ LTPO AMOLED स्क्रीन आहे, तर इतर डिस्प्ले फीचर्स समान आहेत. यामध्ये 5,360mAh बॅटरी आहे , जी Vivo X300 Pro च्या 5,440mAh बॅटरीपेक्षा थोडी छोटी आहे.

या फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल आहे, मात्र Vivo X300 मध्ये 200-मेगापिक्सेल OIS प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेरा आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये एकसारखाच 50-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. लहान असल्याने, फोनचा आकार 150.57×71.92×7.95mm आणि वजन सुमारे 190 ग्रॅम आहे.

हेही वाचा :

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली

चक्रीवादळाचा राज्यावर होणार परिणाम, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, आत्महत्या करणार इतक्यात…