गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर अचानक गगनाला भिडले आहेत.(prices) एक महिन्यापूर्वीपर्यंत टोमॅटो प्रत्येक घरातील ताटातला एक महत्त्वाचा भाग होता, मात्र आता सर्वसामान्य नागरिक विकत घेण्यापूर्वी विचार करत आहेत. पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे, ज्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर झाला आहे. अनेक शहरांमध्ये किमती दुप्पट झाल्या आहेत, ज्यामुळे स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रमुख उत्पादक राज्यांपासून ते दिल्लीसारख्या प्रमुख बाजारपेठांपर्यंत, सर्वत्र टोमॅटोचे दर वाढत आहेत. त्यावर, लग्नाच्या हंगामात वाढत्या मागणीमुळे किमती आणखी वाढल्या आहेत.

सध्या, लोक आवश्यकतेनुसार कमी खरेदी करत आहेत, (prices)येत्या काही दिवसांत बाजार सामान्य होईल अशी आशा आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता टोमॅटो पिकाचाच केवळ आधार ठरला आहे.अरे देवा! टोमॅटो 600 रुपये किलो, किमतीत 400 टक्क्यांनी वाढ, 5000 कंटेनर अडकल्यामुळे पुरवठा निम्म्यावरदिंडोरी तालुक्यात परतीच्या अवकाळी व बेमोसमी पावसामुळे विविध पिकांची वाताहात झाली आहे. भरपाईच्या मागणीबाबत सर्वच स्तरावरुन पाठपुरावा सुरु आहे.

तालुक्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे, भात, नागली, (prices)वरई ही पिकेही धोक्यात आली आहेत. टोमॅटो पिकाचेही नुकसान झालेच आहे, मात्र तुलनात्मक कमी असले तरी सध्या टोमॅटोला असलेले दर हे बऱ्यापैकी असल्याने टोमॅटो उत्पादकांना तेवढाच आधार आता उरला आहे. प्रतवारी व दर्जानुसार उत्पादकांना टोमॅटो मिळतो आहे.दरम्यान, वणी-सापुतारा रस्त्यावरील बाजार समितीच्या उपबाजारात व खोरीफाटा भागात टोमॅटो खरेदी विक्री केंद्र सुरु झाले आहे. सध्यस्थितीत येथे सुमारे ५० हजार क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील व्यापारी टोमॅटो खरेदीचे व्यवहार करत आहेत.

प्रतवारी, पॅकींग करून ट्रकमध्ये टोमॅटो टाकण्याचे काम परप्रांतीय कामगार करतात.(prices) व्यापाऱ्यांनी हे कामगार सोबतच आणले आहेत. तसेच स्थानिक व्यापारीही टोमॅटो खरेदी करुन परराज्यात पाठवित आहेत. प्रतिदीवशी सुमारे २५ टूक टमाटा परराज्यात विक्रीसाठी जात आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापाऱ्यांनी दिली. मोठी आर्थिक उलाढाल यानिमित्ताने होतेआहे. टमाटा खरेदी विक्री व्यवहार प्रणालीमुळे वणी-सापुतारा रस्त्याला यात्रेचे स्वरुप आले आहे. ट्रॅक्टर, पिकअप, जीप, छोटा हत्ती अशा विविध वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, सध्यस्थितीत टोमॅटोला मिळणाऱ्या दरामुळे उत्पादकांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.दिंडोरी तालुक्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानतर दुबार लागवड करण्यात आली होती. पावसाच्या तडाख्यात काही उत्पादकांचे नुकसान झाले. मात्र, तरीही अशा प्रसंगाला सामोरे जाऊन बहुतांशी उत्पादकांनी हे पीक जगविण्यासाठी आर्थिक अतिरिक्त भार सोसला आहे.

हेही वाचा :

चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा

महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?

वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी