मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या(death)निधनाला आता पूर्ण एक महिना झाला आहे. अवघ्या 38 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त झाली होती. प्रियाच्या निधनानंतरचा हा महिना तिच्या कुटुंबासाठी, मित्रपरिवारासाठी आणि चाहत्यांसाठी अत्यंत कठीण होता. मात्र या काळात पती अभिनेता शंतनू मोघे यांनी कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती किंवा प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र नुकतंच शंतनूने सोशल मीडियावर प्रियासोबतचे काही खास फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या दुःखाचा आणि भावनांचा आविष्कार केला असून, या काळात सोबत उभे राहिलेल्या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.

शंतनू आपल्या पोस्टमध्ये लिहितात ‘आज एक महिना पूर्ण झाला. वैयक्तिक दुःख आणि वेदना शब्दांत मांडणं शक्य नाही. इतक्या प्रेमळ, सकारात्मक आणि शुद्ध आत्म्याचा अनपेक्षित, (death)अन्यायकारक आणि दुर्दैवी निरोप घेताना आमचं हृदय आजही तुटतंय. पण प्रियाने असंख्य हृदयांना स्पर्श केला आणि तोही कसा… तिच्या कामातून, कलेतून, प्रेमातून, काळजीने, दयाळूपणाने, संवेदनशीलतेतून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या कृती व सकारात्मक ऊर्जेतून.’ यानंतर शंतनूने देवांनाही चेतावणी दिली ‘देवांना माझी एकच चेतावनी आहे यापुढे तिची काळजी घेण्यात किंवा तिच्यावर प्रेम करण्यात तुमच्याकडून एकही चूक झाली, तर ती माफ केली जाणार नाही. माझी परी… पुन्हा भेटेपर्यंत खूप सारा प्रेम.’

या भावनिक पोस्टमध्ये शंतनूने आपल्या कुटुंबियांपासून ते जगभरातील अनोळखी चाहत्यांपर्यंत सर्वांचे आभार मानले आहेत. ते म्हणतात ‘प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात आमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. ही कृतज्ञता व्यक्त करणारी एक अतिशय खास पोस्ट आहे. (death)ज्यांनी कॉल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, X (ट्विटर), इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर माध्यमांतून प्रियाबद्दल आपलं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त केले, त्या सर्वांसाठी मनःपूर्वक आभार. तुम्ही व्यक्त केलेला ओलावा, प्रामाणिकपणा आणि काळजी आमच्यापर्यंत कोणतीही शंका न ठेवता पोहोचली. जगभरातून आलेल्या असंख्य शुभेच्छा आणि प्रार्थनांमुळे माझा माणुसकीवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. देव तुमचं भलं करो.’

प्रियाच्या आकस्मिक निधनानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. टीव्ही मालिका आणि सिनेमांमधून तिने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. (death)तिच्या जाण्याने मराठी मनोरंजनविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शंतनू मोघेची ही पोस्ट वाचून अनेक चाहते आणि सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर या पोस्टवर ‘डोळे पाणावले’, ‘खूप भावलं’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला