सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगात बेसिक पगारातच येणार महागाई भत्ता, या ३ अलाऊन्समध्येही वाढ?

सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आठवा वेतन आयोग २०२६(government loans) मध्ये लागू होणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. याचसोबत सरकारअजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामध्ये आठव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता हा तुमच्या पगारात येऊ शकतो. याचसोबत काही भत्त्यांमध्येही वाढ होऊ शकते.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता; कधी होणार घोषणा?

११ मार्च २०२५ मध्ये दिल्लीतील SCOVA मीटिंगमध्ये पेन्शनधारकांच्या फिक्स्ड (government loans)मेडिकल अलाउंसबाबत महत्त्वाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सध्या मेडिकल अलाउंस १००० रुपये आहे त्याला वाढवून ३००० रुपये प्रति महिना केला जावा.वाढती महागाई लक्षात घेता हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.हा प्रस्ताव आठव्या वेतन आयोगात सहभागी करण्याची शिफारस केली गेली आहे.

याच बैठकीत सांगितले गेले आहे की, पगारासोबतच हाउस रेंट अलाउंस ,ट्रॅव्हल अलाउंस, महागाई भत्ता , मेडिकल अलाउंसमध्ये वाढ केली जावी. यामुळे कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये वाढ केली (government loans)जाण्याचे शक्यता आहे.याचसोबत सरकार काही जुने भत्ते बंद करण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन सुविधा अजून चांगल्या पद्धतीने मिळेल.

७व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ ठेवला होता. तेव्हा बेसिक सॅलरी १८००० रुपये होती. आता वाढवून २७००० होऊ शकते. ८ व्या वेतन आयोगात महागाई भत्तादेखील दिला जाऊ शकतो. सध्या याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वेतन आयोगाची समिती झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर

धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video

‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं