राज्यातील ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि (elections) पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषदांबरोबरच १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून, या निवडणुकांत प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळवत आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दिग्गज नेत्यांच्या वारसांनी बाजी मारली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात अनेक ठिकाणी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पुणे, सोलापूर, परभणी आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मतमोजणीदरम्यान चुरशीचे चित्र दिसून आले, मात्र अखेरीस अनेक ठिकाणी राजकीय घराण्यांचे पारडे जड ठरले.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (elections) मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पारगाव जरकवाडी गटातून त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी तिसऱ्या फेरीअखेर २,१३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. याच जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. विशेष म्हणजे, पुरंदर पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे दोन्ही सदस्यही विजयी झाल्याने तालुक्यावर पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (elections) येथे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांनी तब्बल ६,८०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. याच जिल्ह्यात भाजपचे नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवत राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील (elections) गुहागर विधानसभा मतदारसंघातील असगोली जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत विजयाकडे कूच केली. त्यांनी ५७१ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यावर मात केली. तर रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले.
एकूणच, या निवडणुकांतून ग्रामीण राजकारणात घराणेशाहीचा प्रभाव अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणासाठी हे निकाल महत्त्वाचे संकेत देणारे ठरत आहेत.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी