सोशल मिडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणि आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे असे अनेक दृश्य शेअर केले जातात जे कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. परंतु, अलिकडेच इंटरनेटवर चोरीचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात दुकानदाराने चोरी करु पाहणाऱ्या महिलेला अक्षरश: धु धु धुतलं. महिलेने दुकानदाराच्या(Shopkeeper) डोळ्यात मिर्ची पावडर फेकत चोरी करण्याचा प्लॅन केला होता पण घडलं भलतंच. महिलेने विचारही केला नसेल अशी भयंकर घटना तिच्यासोबत घडली आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका दागिन्यांच्या दुकानातील(Shopkeeper) दृश्ये दिसून येत आहे. यात एक व्यक्ती गल्ल्यावर बसला असून त्याच्या समोर एक महिला उभी असते. ही महिला खरंतर चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानात आलेली असते. व्हिडिओमध्ये दिसते की, महिला अचानक एक पावडर दुकानदाराच्या डोळ्यावर फेकण्याचा प्रयत्न करते पण दुकानदार तिच्या या हल्ल्यापासून वाचतो आणि क्षणाचाही विलंब न करता तो लगेचेच तिला पकडतो. व्हिडिओत पुढे जे घडते ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. दुकानदार महिलेला पकडताच तिच्या एका मागून एक कानशिलात लगावण्यास सुरुवात करतो. सांगण्यात येत आहे की, त्याने तब्बल 17 वेळा महिलेच्या कानशिलात लगावली व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळाली नसून याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @himm नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने मनापासून तिला धुतलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्ण 17 शाॅट कम्प्लिट” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “घरातला राग पण त्याने महिलेवर काढला”.

हेही वाचा :
निवडणुका जाहीर झाल्या! राजकीय हालचाली वाढल्या!
PhonePe वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! कंपनीने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ? पडझडीचा होणार फायदा