एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबाम यांच्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार(Female) घडला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर कारावईची मागणी केली केली जात आहे. या घटनने संपूर्ण जगभरातही खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेनबाम यांनी देखील यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मंगळवारी (०४ नोव्हेंबर) मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीत एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी शेनबाम नागरिकांशी संवाद साधत होत्या. यावेळी एका व्यक्तीने अचानक येऊवन त्यांना कबंरेने पकडेल आणि त्यांच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या प्रायव्हेट पार्टला देखील हात लावण्याचा प्रयत्न केला. या त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती.

सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेवेळी राष्ट्राध्यक्षा भांबावल्या नाहीत, तर त्यांनी शांतपणे व्यक्तीला बाजूला केले आणि हसत हसत सुरक्षा कर्मचाऱ्यांना काळजी करु नका, असे म्हटले. यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कोणतीही मोठी कारवाई न करता, केवळ त्या व्यक्तीला दूर केले.

या घटनेनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. लोक तीव्र संताप व्यक्त करत होते. तसेच यामुळे राष्ट्रपतींच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले.या घटनेवेळी शीनबॉम यांनी संयम बाळगून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. यानंतर त्यांनी बुधवारी (०५ नोव्हेंबर) देशभरात लैंगिक छळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांसोबत गैरवर्तन करणाऱ्याला व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.

बुधवारी (०४ नोव्हेंबर) एका पत्रकार परिषदेत या घटनेवर (Female)प्रतिक्रिया देताना क्लॉडिया शीनबॉम म्हणाल्या की, जर इथे मी देखील सुरक्षित नाही, तर मेक्सिन महिलांचे काय? त्यांनी म्हटले की, सरकार आता सर्व राज्यांमधील गुन्हेगारीचा आढावा घेईल आणि गुन्हेगारांना कठोरतली कठोर शिक्षा दिली जाईल. यासाठी सरकार एक मोहिम सुरु करणार असल्याचेही शीनबॉम यांनी म्हटले.

हेही वाचा :

निवडणुका जाहीर झाल्या! राजकीय हालचाली वाढल्या!
PhonePe वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! कंपनीने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ? पडझडीचा होणार फायदा