आजकाल प्रत्येकजण PhonePe अॅपचा वापर करतो. दूध, फळे, भाज्या खरेदीपासून ते मोठे ऑनलाइन पेमेंटपर्यंत सर्व ठिकाणी PhonePe हा सोयीचा पर्याय बनला आहे. आता या अॅपने आपल्या यूझर्ससाठी एक मोठा बदल जाहीर केला आहे. कंपनीने नवे सुरक्षा फीचर आणून व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.फोनपे(PhonePe) यूझर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता व्यवहार करताना फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. कंपनीने “PhonePe Protect” नावाचे हे नवे फीचर सुरू केले असून ते वापरकर्त्यांना संशयास्पद व्यवहारांपासून संरक्षण देईल.

आघाडीचे आर्थिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म PhonePe ने जाहीर केलेले हे फीचर व्यवहाराच्या वेळी संशयास्पद नंबर ओळखून यूझर्सना तत्काळ चेतावणी देते. जर वापरकर्ता अशा नंबरवर पैसे पाठवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला स्क्रीनवर “वार्निंग मेसेज” दिसेल. यामुळे यूझर वेळेवर सावध होऊन व्यवहार(PhonePe) थांबवू शकतो.या फीचरला दूरसंचार विभागाच्या“Financial Fraud Risk Indicator ” टूलचे समर्थन मिळाले आहे. या टूलच्या मदतीने PhonePe संशयित नंबर शोधते आणि आवश्यकतेनुसार व्यवहार ब्लॉक करते. म्हणजेच, सायबर फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा हा एक प्रभावी मार्ग ठरणार आहे.
PhonePe ची सिस्टम इंटेलिजन्स तंत्रज्ञान पेमेंट प्रक्रियेच्या वेळी धोके ओळखते आणि यूझर्सना रिअल-टाइम सूचनांद्वारे सावध करते. तसेच उच्च जोखमीच्या नंबरच्या बाबतीत अॅप व्यवहार नाकारते, तर मध्यम जोखमीच्या नंबरसाठी यूझर्सना आधीच इशारा दाखवते.यामुळे वापरकर्त्यांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते आणि फसवणूक टाळता येते. PhonePe हा DoT च्या FRI तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारा देशातील पहिला डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ठरला आहे.
2025 च्या इंडिया मोबाइल काँग्रेस मध्ये PhonePe आणि DoT यांच्या या भागीदारीला विशेषत्वाने हायलाइट करण्यात आले. FRI सारख्या AI-आधारित टूलचा वापर करून सायबर फसवणुकीविरुद्ध लढा देण्यासाठी PhonePe ला सन्मानितही करण्यात आले.दरम्यान PhonePe चे ट्रस्ट सेफ्टी प्रमुख अनुज भन्साळी यांनी सांगितले की, “आम्ही या नवीन फीचरसह पेमेंट सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहोत. ‘PhonePe Protect’ हे भारतात सुरक्षित डिजिटल पेमेंट इकोसिस्टम निर्माण करण्यासाठीचा आमचा मोठा प्रयत्न आहे.”

हेही वाचा :
बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ? पडझडीचा होणार फायदा
एक महिना सलग मीठ न खाल्ल्यास काय होईल?
कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या…