शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी तुम्ही घराबाहेर कामानिमित्त ओला-उबर (country) किंवा रॅपिडो बुक करणार असाल तर सावध रहा. कारण देशभरातील ओला-उबर चालक संपावर जाणार आहेत. हा संप सहा तासांचा असणार आहे. देशभरात महानगरांसह अनेक भागातील ओला-उबर चालक या संपात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे या संपाची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.देशभरातील अ‍ॅप-आधारित वाहतूक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन ने हा संप पुकारला आहे. ७ फेब्रुवारी रोजी अ‍ॅप-आधारित चालक सहा तासांच्या संपावर जातील असे संघटनेने म्हटले आहे. मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२५ लागू असूनही याचे पालन न करता अ‍ॅग्रीगेटर कंपन्या मनमानीपणे भाडे ठरवत आहेत, त्यामुळे ओला-उबर चालकांचे कमिशन कमी झाले आहे. त्यामुळे चालकांचे उत्पन्न आणि रोजगार दोन्ही धोक्यात आले आहेत.

सरकारने किमान भाडे निश्चित करावे ज्यामुळे चालकांना प्रति राईड निश्चित (country)आणि सन्मानजनक उत्पन्न मिळू शकेल असे युनियनने म्हटले आहे. तसेच व्यावसायिक राईड्ससाठी खाजगी वाहनांच्या वापरावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. खाजगी वाहनांचा वापर करणाऱ्या व्यावसायिक राईड्स अनैतिक स्पर्धा निर्माण करत आहेत, ज्यामुळे परवानाधारक आणि कायद्याचे पालन करणाऱ्या चालकांचे उत्पन्न आणि रोजगार दोन्ही धोक्यात आले आहेत असेही युनियनने म्हटले आहे.

किमान भाड्याची तरतूद नसल्यामुळे चालकांचे उत्पन्न सातत्याने कमी होत आहे, (country)ज्यामुळे त्यांची आर्थिक संकट वाढत आहे. अनेक वाहनचालकांसाठी, हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे आणि वाढत्या खर्च, इंधनाच्या किमती आणि कमी भाडे यामुळे गुजराण होणे कठीण झाले आहे. देशभरातील अॅप-आधारित वाहतूक कामगारांना संपात सामील होण्याचे आवाहन युनियनने केले आहे.या संपाचा प्रवाशांच्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून लोकांनी उद्या वाहतुकीच्या पर्यायी साधनांची आगाऊ व्यवस्था करावी किंवा त्यांच्या प्रवासाच्या योजनांमध्ये बदल करावा असा सल्ला दिला जात आहे.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी