गेल्या काही काळात अमेरिकेने विविध देशांवर कर आणि निर्बंध लादण्याची (various countries) भूमिका अधिक आक्रमक केली आहे. अशातच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आणखी कठोर पाऊल उचलले असून त्यांनी एका महत्त्वाच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार आता अमेरिका इराणकडून थेट किंवा अप्रत्यक्षपणे वस्तू अथवा सेवा खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.

अमेरिकन सरकारच्या या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, (various countries) भविष्यात परिस्थितीत बदल झाला किंवा इराण अथवा संबंधित देशांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण किंवा आर्थिक हितसंबंधांबाबत समन्वय साधण्यासाठी ठोस पावले उचलली, तर या आदेशात आवश्यक ते बदल करण्यात येऊ शकतात. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी परराष्ट्र सचिव, वाणिज्य सचिव आणि व्यापार प्रतिनिधींना करप्रणाली तसेच संबंधित उपाययोजनांबाबत नियम व मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.
व्हाईट हाऊसच्या मते, या (various countries) निर्णयामागचा मुख्य उद्देश इराणच्या धोरणांना आळा घालणे हा आहे. इराणकडून अणुक्षमता विकसित करण्याचा प्रयत्न, दहशतवादाला दिला जाणारा पाठिंबा, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास आणि मध्य पूर्वेतील अस्थिरता हे घटक अमेरिकेच्या तसेच तिच्या सहयोगी देशांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात इराणमधील अंतर्गत परिस्थितीवरही (various countries) गंभीर टीका केली आहे. इराणी राजवटीकडून संसाधनांचे मोठ्या प्रमाणावर गैरव्यवस्थापन होत असल्याचे नमूद करत, देशातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करून अणु व क्षेपणास्त्र कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा थेट फटका इराणच्या सामान्य नागरिकांना बसत असून त्यांना तीव्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच इराणी सरकारकडून आंदोलकांवर केलेली दडपशाही आणि हजारो लोकांच्या मृत्यूंचा उल्लेख करत, या कृती अमेरिकेसाठी सातत्याने धोका निर्माण करत असल्याचेही व्हाईट हाऊसने म्हटले आहे. अमेरिकन नागरिक, मित्रदेश आणि राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा पुनरुच्चार प्रशासनाने केला आहे.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी