बिटकॉईनच्या (Bitcoin)अलीकडील घसरणीनंतर आता बाजारात सौम्य सुधारणा दिसू लागली आहे. गेल्या महिन्यात जवळपास 20% पडझड झाल्यानंतर, बिटकॉईनने पुन्हा $106,000 चा स्तर गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्पकालीन गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे आलेली अस्थिरता आता हळूहळू कमी होत आहे.Glassnode च्या ताज्या आकडेवारीनुसार, बिटकॉईनचा आधारभूत स्तर $103,000 वर टिकून आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात आत्मविश्वास परतताना दिसत आहे. तथापि, $111,000 ते $113,000 हा स्तर अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

CryptoQuant च्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात सुमारे 1.2 लाख ट्रेडर्सनी आपली पोझिशन बंद केली. तरीही, संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून वाढलेली खरेदी बाजाराला थोडा स्थैर्य देत आहे.MEXC रिसर्चचे मुख्य विश्लेषक शॉन यंग म्हणाले, “अमेरिका-चीनमधील व्यापार करारात काही सकारात्मक संकेत मिळत आहेत. यामुळे नोव्हेंबरच्या उत्तरार्धात क्रिप्टो मार्केटमध्ये चांगली तेजी दिसण्याची शक्यता आहे.”

दरम्यान, इथेरियम, सोलाना आणि बायनान्स कॉईन सारख्या प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्येही 3-5% दरम्यान वाढ नोंदवली गेली आहे.क्रिप्टो विश्लेषकांच्या मते, बिटकॉईनने (Bitcoin)जर पुढील काही दिवसांत $113,000 चा प्रतिकार स्तर पार केला, तर पुढील लक्ष्य $120,000 पर्यंत पोहोचू शकते. तथापि, बाजारात अजूनही उच्च अस्थिरता असल्याने गुंतवणूकदारांना सावधगिरीचा सल्ला देण्यात येत आहे.

हेही वाचा :

 कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या…
रशियन तेलावर लादणार नवे निर्बंध..; मोदी सरकारचा नाव प्लॅन?
BSNLने लाँच केला सर्वात स्वस्त रिचार्ज, दररोज मिळणार 2 जीबी डेटा