सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. 347 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या प्लॅनमध्ये (recharge)50 दिवसांची वैधता असून दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 80 Kbps पर्यंत कमी केली जाते. हा प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी डिझाइन केला आहे जे वारंवार रिचार्ज करणे टाळू इच्छितात आणि कमी किमतीत चांगले फीचर्स हवे आहेत.

बीएसएनएलच्या अधिकृत एक्स अकाउंटवर या प्लॅनची माहिती जाहीर करण्यात आली असून, 50 दिवसांच्या वैधतेमुळे वापरकर्त्यांना दीर्घकालीन रिचार्जचा(recharge) त्रास कमी होतो. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन खूप स्वस्त असून, इतर ऑपरेटरांच्या तुलनेत कमी किंमतीत अधिक सुविधा देतो. विशेषतः ज्या भागात बीएसएनएलची 4G सेवा उपलब्ध आहे, तिथे हा प्लॅन वापरकर्त्यांसाठी प्रभावी आणि परवडणारा पर्याय ठरतो.

अलीकडे BSNLने त्यांच्या नेटवर्क पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत आणि अनेक शहरांमध्ये 4G सेवा सुरू केली आहे. कंपनीचे लक्ष आता वापरकर्त्यांना सुधारित कॉल गुणवत्ता, जलद डेटा गती आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर आहे. 347 रुपयांचा हा नवीन प्लॅन BSNLच्या ग्राहकांचा विस्तार करण्याचा आणि नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

हेही वाचा :

बीटरूट सॅलड आता घरीच बनवा; वजन कमी करण्यास करेल मदत
मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार…
फक्त एका क्लिकवर परत मिळवा WhatsApp वरील डिलीट झालेले मेसेज