आजकाल WhatsApp वरील महत्त्वाचे चॅट्स चुकीने डिलीट होणे अनेकांसाठी एक मोठा ताणाचा विषय ठरतो. काही महत्त्वाचे मेसेज, फोटो किंवा कागदपत्रे डिलीट झाल्यावर पुन्हा मिळवणे कठीण असते, ज्यामुळे कामे अडकू शकतात. मात्र, WhatsApp च्या क्लाउड बॅकअप फिचरचा वापर करून डिलीट झालेल्या चॅट्स (messages)सहजपणे रिकव्हर करता येतात. यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स आणि ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात.

Android वापरकर्त्यांसाठी, प्रथम WhatsApp उघडून Settings > Chats > Chat backup मध्ये जाऊन बॅकअपची तारीख तपासणे आवश्यक आहे. जर डिलीट होण्याआधीचा बॅकअप उपलब्ध असेल, तर WhatsApp अनइंस्टॉल करून पुन्हा इंस्टॉल करा. इंस्टॉल करताना तुम्ही वापरत असलेले Google खाते आणि फोन नंबर निवडा, त्यानंतर Restore पर्यायावर क्लिक करून जुनी चॅट्स परत मिळवता येतील.
iPhone वापरकर्त्यांसाठी प्रक्रिया जवळजवळ सारखीच आहे. iCloud वर बॅकअपची तारीख तपासून, WhatsApp अनइंस्टॉल करा आणि App Store मधून पुन्हा इंस्टॉल करा. फोन नंबर पडताळल्यानंतर दिसणारा ‘Restore Chat History’ पर्याय निवडल्यास जुनी चॅट्स तुमच्या फोनवर रीलोड होतील.
तथापि, लक्षात ठेवा की बॅकअप रिस्टोर केल्यास बॅकअपनंतर आलेले नवीन मेसेज (messages)गमावले जाऊ शकतात. तसेच, रिकव्हरीसाठी बॅकअप घेतलेला फोन नंबर आणि अकाउंट वापरणे आवश्यक आहे. ‘Restore’ प्रॉम्प्ट फक्त एकदाच दिसतो, त्यामुळे चुकीच्या वेळी हे टाळण्यासाठी WhatsApp पुन्हा इंस्टॉल करून योग्य वेळी Restore निवडणे महत्त्वाचे आहे. या सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही WhatsApp वर डिलीट झालेले महत्त्वाचे चॅट्स सहज रिकव्हर करू शकता.

हेही वाचा :
गाडी धुताना 8 वर्ष लहान गर्लफ्रेंंडसोबत रोमॅंटिक झाला हार्दिक पंड्या
‘शंकर महाराज’च्या नावे भोंदूगिरी, आयटी इंजिनिअरची भयंकर फसवणूक
लाडकी कोण? नावडती कोण? घराघरात भांडण… उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल