शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील ‘दगाबाज रे संवाद’ या दौऱ्यावर असून, आज त्यांनी बीड जिल्ह्यातील पाली गावात(house) शेतकरी आणि महिलांशी संवाद साधला. या संवादादरम्यान उद्धव ठाकरेंनी केवळ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत, तर राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरही जोरदार टीका केली.

पाली येथे उपस्थित असलेल्या महिलांना थेट प्रश्न विचारत उद्धव ठाकरे म्हणाले, “तुमच्यापैकी किती महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो? निवडणुकीपूर्वी सर्वांना लाभ मिळाला होता का?” यावर उपस्थित महिलांकडून होकारार्थी प्रतिसाद मिळताच त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “आता सरकारने नियम बदलून घरातील केवळ दोन महिलांनाच लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच सध्याचे मुख्यमंत्री या योजनेच्या माध्यमातून घराघरात भांडणं लावण्याचं काम करत आहेत.”

यावेळी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला’ या विधानाचा संदर्भ देत सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले, “मोहन भागवत म्हणतात, जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला. मग एका घरात सासू आणि दोन सुना, आई आणि दोन मुली किंवा चार बहिणी असतील, तर कोणाला लाभ द्यायचा? अशा परिस्थितीत सरकारने महिलांमध्येच मतभेद निर्माण केले आहेत.”

ठाकरेंनी पुढे म्हटलं, “ज्या महिलेला या योजनेचा लाभ मिळतो ती ‘लाडकी’, आणि जिला मिळत नाही ती ‘नावडती’. राज्यकर्त्यांनी असा भेदभाव करू नये. सर्वांना समान (house)न्याय मिळायला हवा, हेच खरे राज्यकर्तेपण.”‘दगाबाज रे संवाद’ दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यातील विविध प्रश्नांवर थेट जनतेशी संवाद साधत असून, त्यांनी या सभेतून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी महिला मतदारांपर्यंत भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा :

ट्रेनमधून फुस्स करून फुत्कारला अजगर, पाहताच लोकांची हवा झाली टाईट; Video Viral
Vitamin D ची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, हाडांमध्ये वाढेल ताकद
दोघांना बुटाने मारेन, अभिषेक शर्मा, शुबमन गिलला युवराज सिंहने अशी धमकी का दिली?