अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.(created) सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून तातडीने निवड होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्या एका ट्विटमुळे चर्चेला नवं वळण मिळालं आहे. या ट्विटमधून त्यांनी थेट कुणाचं नाव न घेता सध्याच्या राजकीय गोष्टींवर आणि अजितदादांच्या उल्लेखावर सूचक भाष्य केल्याचं बोललं जात आहे.अजित पवार यांच्या निधनाला अवघे काही दिवस उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आज दुपारी त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेता म्हणून निवड झाली असून ५ वाजता शपथविधी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचं ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामागील अर्थावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

रोहित पवार यांनी बारामतीच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत लिहिलं की,(created) आतापर्यंत बारामतीत सत्तेच्या पदावर जाणाऱ्यांसाठी अभिनंदनाचे मोठमोठे बॅनर लागायचे आणि त्यावर अजितदादांचा देखणा फोटो झळकायचा. मात्र आजच्या परिस्थितीत अशा बॅनरऐवजी श्रद्धांजलीचे फलक दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं.या ट्विटमधून त्यांनी थेट कुणाचं नाव न घेता सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि जलद निर्णय प्रक्रियेवर अप्रत्यक्ष भाष्य केल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या एका वाक्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आलं असून, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये अजित पवार यांच्या नावापुढे (created)‘स्वर्गीय’ शब्द वापरण्याबाबतही भावनिक आवाहन केलं आहे. “डोंगराएवढ्या दुःखापुढं आज ना पदाचं कौतुक आहे, ना आनंदाचा जल्लोष… गळ्यात हार घातलेला अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाही,” असं म्हणत त्यांनी जनतेला हात जोडून विनंती केली की, अजितदादा हे आपल्यातच होते, आहेत आणि त्यांच्या कार्यातून कायम राहणार आहेत, त्यामुळे त्यांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ शब्द लावू नये.या भावनिक प्रतिक्रियेमुळे रोहित पवार यांचा सूर शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय उत्साहावर संयम ठेवण्याचा असल्याचं दिसून येत आहे. मात्र त्यांच्या ट्विटचा राजकीय अर्थ लावला जात असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासमीकरणांबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद

इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!

फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?