उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाले, त्यानंतर राज्याच्या (decision) राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित होईल. या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावरही चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार यांनी आज मत व्यक्त केले. बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मोठं व्यक्तव्य केले. १२ तारखेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब होणार होते, पण अजितदादांचा अपघाती निधन झाले अन् चर्चा थांबली, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी अजितदादा यांनी इच्छाही सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. (decision) आणि 12 तारखेला निर्णय जाहीर होणार होता.. असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी केलाय पवारांनी केलाय.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती.. असंही शरद पवारांनी म्हटलंय.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले.अजितदादादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात यावर चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय 12 तारखेला जाहीर होणार होता, पण अजित पवार यांचं अपघाती निधन झाले, आता चर्चेला खंड पडला, असा गौप्यस्फोटही शरद पवारांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असेही ते म्हणाले.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मी सकाळी वाचलेय, (decision) मला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती, असे शरद पवार म्हणाले. अजितदादा पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यामुळे पक्षाने निर्णय घेतला असेल. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीति दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शरद पवारांना पत्रकारांनी शपथविधीला जाणार का? असा सवाल केला, त्यावर बोलताना ते म्हणाले की, शपथविधीसोहळ्याबाबत काहीही माहिती नाही. मी तर इथे बारामतीत आहे, मग कसा जाणार?

हेही वाचा :

लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद

इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!

फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?