सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीआधीच (minutes) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेल्या 15 मिनिटांच्या पत्रकार परिषदेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 72 तासांत शपथविधी होणं, आणि त्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं शरद पवारांनी सांगितल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पत्रकार परिषदेमुळे पक्षांतर्गत हालचाली आणि निर्णयप्रक्रियेवर चर्चांना उधाण आलं आहे.“सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला काहीच कल्पना नव्हती. माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही,” असं सांगत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील काही नेत्यांकडे बोट दाखवलं आहे. त्यांनी थेट नाव न घेतलं असलं तरी त्यांच्या वक्तव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत.

शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत सूचित केलं की राष्ट्रवादी (minutes)काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि पार्थ पवार यांनीच हा निर्णय घेतला असावा. या सर्वांनी पक्षांतर्गत बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. पवार कुटुंबाला विश्वासात न घेता हा निर्णय झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी रात्री बारामतीतील एका हॉटेलमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांच्यात बैठक झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीनंतर तटकरे आणि पटेल तातडीने मुंबईला गेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. याच बैठकीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाल्याचं पवारांनी सूचित केलं.
शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलीनीकरणाबाबतही (minutes)महत्त्वाचा खुलासा केला. अजित पवार स्वतः या विलीनीकरणासाठी प्रयत्नशील होते आणि त्यांनी यासाठी तब्बल 14 बैठका घेतल्या होत्या, असं पवारांनी सांगितलं. सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यासोबतही या विषयावर चर्चा झाली होती आणि सर्व नेते सकारात्मक होते, असा दावाही त्यांनी केला. “दोन राष्ट्रवादी गट एकत्र यावेत ही अजितदादांची इच्छा होती. ती पूर्ण व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे,” असं मोठं वक्तव्य करत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे काही नेते विलीनीकरणासाठी तयार नव्हते, असा संकेत दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे तटकरे, पटेल, मुंडे आणि पार्थ पवार यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद
इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!
फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?