जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून बारामतीच्या दिशेनं निघालं (plane) असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि याच अपघातानं महाराष्ट्रातील धडाडीचा नेता हिरावला. राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या जाण्यानं एक कायमची पोकळी निर्माण झाली. उत्तम नेतृत्त्वं आणि सामान्यांमध्ये राहून काम करण्याची धमक असणाऱ्या अजित पवार यांनी मागे सोडला तो म्हणजे त्यांच्या कामावा वारसा. उमुख्यमंत्र्यांच्या या विमान अपघातावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातच विमानाची अपघातानंतरची अवस्था पाहता प्रत्येकालाच धक्का बसला. मात्र हा अपघात नेमका कसा झाला आणि अपघातापूर्वी विमानात नेमकं काय घडलं, याची माहिती ‘ब्लॅक बॉक्स’च्या माध्यमातून हाती लागणार असल्याचं म्हटलं गेलं.

अजित पवारांच्या विमान अपघातानं राज्यासोबतच केंद्रीय यंत्रणासुद्धा (plane)हादरल्या असलाना विमान कंपनीवरही कारवाई करण्यात आली. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली, जिथं बारामती विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सापडला असं सांगण्यात आलं. मात्र आता त्याचसंदर्भातील आणखी एका माहितीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बारामतीमध्ये अपघात झालेल्या लियरजेट विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून या संपूर्ण अपघाताचा तपास जलदगतीने सुरू आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गुरुवारी दिली. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचा समावेश असलेला ब्लॅक बॉक्स अर्थात हे एक असं उपकरण जे तांत्रिक उड्डाण पॅरामीटर्स आणि कॉकपिट ऑडिओ रेकॉर्ड करतं आणि त्या माध्यमातून तपासकर्त्यांना महत्त्वाची माहिती मिळते. सध्या या अपघातातून मिळालेल्या ब्लॅक बॉक्समधील उपकरणं आणि डेटाचं आगीमुळे कोणत्याही प्रकारे नुकसान झालं आहे का, हे तपासलं जात आहे. अशा परिस्थितीत डेटा काढण्यास सामान्यतः अपेक्षेहून अधिक वेळ लागतो असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
AAI कडून अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सुरू असल्याची (plane)माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर देताना त्यांनी ही माहिती देण्यात आली. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून केली होती. इतकंच नव्हे, तर भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, यादृष्टीने तातडीने पावलं उचलण्यात यावीत, अशीही मागणी पत्रातून करण्यात आली. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल, स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल आणि हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ, असं केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं. तेव्हा आता ब्लॅक बॉक्समधून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि ही माहिती कधी समोर येते यावरच संपूर्ण राज्याचं लक्ष असेल.
हेही वाचा :
तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!
स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…
कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?