‘मी एवढं काम करतो, पण तरीही एखादं गालबोट का लागतं, ही खंत कायम मनात असते,’(regret)अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे सक्रिय असतानाही एखाद्या घटनेमुळे संपूर्ण कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं, याची सल त्यांना आजही बोचत असल्याचं त्यांनी सूचक शब्दांत सांगितलं. विकासकामे, निर्णयक्षमता आणि प्रशासकीय अनुभव असूनही एखाद्या वादामुळे प्रतिमा मलीन होते, हे वास्तव राजकारणात अपरिहार्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेताना अजित पवार म्हणाले की, (regret)जनतेसाठी काम करताना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय तत्काळ लोकांना रुचत नाहीत, तर काहींचे परिणाम उशिरा दिसून येतात. मात्र, कामाचा हेतू प्रामाणिक असला तरी टीका थांबत नाही, हीच मोठी खंत असल्याचं त्यांनी सांगितलं.

राजकारणात यशाबरोबरच वादही येतात. एका चुकीच्या आरोपामुळे किंवा (regret)एका प्रसंगामुळे संपूर्ण कारकीर्दीवर शिक्का बसतो, असं मत व्यक्त करत त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही सूचक भाष्य केलं. तरीसुद्धा टीकेला घाबरून न थांबता काम करत राहणं, हा आपला स्वभाव असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनतेचा विश्वास आणि कामाची दखल हेच खऱ्या अर्थाने समाधान देत असल्याचं सांगत त्यांनी पुढील काळातही विकासावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा :

तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!

स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…

कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?