कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

बुधवारी सकाळी बारामती नजीकच्या विमान अपघातात राज्याचे (politics)उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्यानंतर काही शंकासुरांनी अपघात की घातपात अशा कुशंका व्यक्त केल्या. याशिवाय दादांच्या नंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार किंवा राज्याचे राजकारण कोणत्या “मोड” वर जाणार अशी प्रश्नांकित चर्चा सुरू झाली.एका उतावीळ वृत्तवाहिनीने तर बुधवारीच राजकीय विश्लेषकांना यासंदर्भात बोलत केलं. मात्र अजितदादा यांच्या पश्चात लगेचच राजकारणात उलटा पालनात होईल असे काही नाही. किंबहुना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असेही नाही. पण नजीकच्या काही दिवसात राजकारणाचे थोडेफार संदर्भ मात्र नक्कीच बदलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार हेच सर्वेसर्वा होते. पक्षाच्या निर्णया प्रक्रियेत त्यांचा शब्द अंतिम असायचा. पक्षावर त्यांची जबरदस्त पकड होती.पक्षातील प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आधी महत्वकांक्षी नेत्यांना त्यांनी ठराविक अंतरावरच ठेवले होते. मध्यंतरी सुनील तटकरे हे भाजपवासी होणार अशा बातम्या ऐकायला येत होत्या.आता ही मंडळी पक्ष आपल्या हाती ठेवण्यासाठी प्रयत्न नक्की करतील पण महायुती मधलं स्थान जैसे थे ठेवतील. कारण अजित दादा पवार यांनी शरद पवारांच्या पासून फारकत घेण्याचा घेतलेला निर्णय हा सत्तेसाठीच होता. शिवाय अडचणीत असलेल्या आपल्या काही सहकाऱ्यांना सत्तेची कवच कुंडले देण्याचाही त्यांचा त्यामागचा विचार होता.

त्यामुळे ही मंडळी सत्तेपासून दूर जाणार नाहीत. (politics)राज्याच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची रिक्त झालेली जागा भरली जाईल तेव्हा या राष्ट्रवादीमध्ये कोणाची हुकूमत आत्ता आहे हे समजणार आहे. महिन्याभरात त्यावर निर्णय अपेक्षित आहे. याशिवाय बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होईल तेव्हा दादांच्या घरातीलच पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाईल. मात्र त्यांचा जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंध असल्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. अजितदादा यांच्या पश्चात ज्यांची नावे पुढे येतात त्यांच्याकडे दादांच्या इतके संघटन कौशल्य नाही हेही तितकेच खरे आहे. गेल्या महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे बोलले जात होते. ज्यांना तसे वाटते त्यांच्याकडून एकत्रित करण्याचा अजेंडा पुढे केला जाईल. शरद पवार यांनी जवळपास राजकीय निवृत्ती स्वीकारली आहे फक्त तशी घोषणा होणे बाकी आहे.राज्यसभेची मुदत संपल्यानंतर आपण पुन्हा कोणतीही निवडणूक लढवणार नाही हे त्यांनी या आधीच स्पष्ट केले आहे. त्यांची राज्यसभेची मुदत काही महिन्यानंतर संपणार आहे. एकत्र येणे म्हणजे कुणीतरी आपला पक्ष विलीन केला पाहिजे.

शरद पवार गटाचे अस्तित्व आता फार जाणवण्या इतकं नाही (politics)त्यामुळे त्यांना आपला गट अजितदादा गटामध्ये विलीन करावा लागेल किंवा एकत्र येण्याची प्रक्रिया आधी पार पाडली जाईल आणि शरद पवार गटाकडून अजितदादा गटाच्या विरुद्ध घड्याळ या निवडणूक चिन्ह विषयी जी याचिका दाखल आहे ती मागे घेतली जाईल. पण हे लवकर घडेल असे मात्र नाही. अजित दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही नजीकच्या काळात घडेल त्यावर भाजपचे बारीक लक्ष असेल. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांचा प्रभाव असेल.बुधवारी बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या जवळ विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि इतर चौघांचा होरपळून मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर काही वेळातच काही शंका सुरांनी हा घातपातच आहे अशा अर्थाची चर्चा सुरू केली. शरद पवार यांनी हा निखळ अपघात आहे त्यामध्ये कुणी राजकारण करू नये असे स्पष्ट करूनही बुधवारी अशी चर्चा होत राहिली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, अजित दादा पवार हे (politics)भाजपची साथ सोडणार होते. त्यामुळे या विमानाला अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती कडून चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली होती. या देशात कुणी सुरक्षित नाही असे वक्तव्य करून त्यांनी हा अपघात नवे घातपात असल्याचे सूचित केले होते. मात्र अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू घडवून कुणाचा फायदा होणार होता? महाराष्ट्रात आता आणखी चार वर्षानंतरच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अजित दादा हे कोणाला अडचणीत आणू शकतात किंवा त्यांच्यापासून आपली अडचण होते ही सगळी वाऱ्यावरची वरात आहे. शरद पवार तसेच अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांकडून या अपघाता विषयी काहीही शंका घेतलेली नाही. हा एक अपघात आहे हे वास्तव त्यांनी स्वीकारलेले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या मागणीला काही अर्थ उरत नाही.

हेही वाचा :

तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!

स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…

कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?