राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (leader)प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा पक्षप्रवेश समारंभ आज चाकण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

अतुल देशमुख हे खेड तालुक्यातील प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडणार आहे. भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(leader) गेलेले देशमुख आता शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याने, शिवसेनेला ग्रामीण भागात मोठे बळ मिळेल, असे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेला उमेदवारी नाकारल्यामुळे आणि स्थानिक स्तरावरील अंतर्गत मतभेदांमुळे अतुल देशमुख नाराज होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत धनुष्यबाण हातात घेतला आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव सातत्याने वाढताना दिसतोय. अतुल देशमुख यांच्या प्रवेशाने या संघटनेला आणखी ताकद मिळेल, असा अंदाज राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची (2025) तयारीही वेगाने सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या प्रारूप मतदार याद्यांचे काम सुरू आहे. निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना परवानगीशिवाय रजा घेऊ नये, अन्यथा कारवाई होईल, असे आदेश पुणे महापालिकेकडून जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा :
लँडिंगवेळी विमानाच्या पंखामध्ये अडकला पतंगाचा दोरा अन्…
महिला राष्ट्राध्यक्षांवर ऑन कॅमेरा छेडछाड; मद्यधुंद अवस्थेत माणसाने केला KISS करण्याचा प्रयत्न, Video Viral
कोपेश्वर मंदिर हजारो दिव्यांनी उजळले…