राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात झाली असताना, दुसऱ्या बाजूला पक्षांतराची लाटही तीव्र झाली आहे.
नुकतेच महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत(Political) दाखल झाले होते, मात्र आता परिस्थिती उलटी होताना दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेतेच मित्र पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत असून, याचा मोठा फटका शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे झालेल्या कार्यक्रमात आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. झावरे यांच्या प्रवेशामुळे पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. सुजित झावरे हे दिवंगत माजी आमदार वसंतराव झावरे यांचे पुत्र असून, पारनेर तालुक्यात त्यांचा प्रभाव मोठा मानला जातो. पक्षप्रवेशावेळी बोलताना झावरे म्हणाले,

“अजित पवार यांच्या पक्षात डावलले जात होते, दिलेला शब्द पाळला गेला नाही. एकनाथ शिंदे यांनी विकासाचा शब्द दिला, म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”या प्रवेशामुळे अजित पवार गटाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यातील राजकीय(Political) समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.आता पारनेर तालुक्यातील स्थानिक निवडणुका या नव्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिक चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा :

आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो दुधी, भाजी खायला आवडत नसेल तर त्यापासून बनवा हे 5 चविष्ट पदार्थ
RCB विक्रीसाठी सज्ज! विराट कोहलीच्या टीमचा नवीन मालक कोण होणार?
”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या, फराह खानने केला खुलासा