आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक — रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू — लवकरच नव्या मालकाच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे(team). सध्याचे मालक, ब्रिटनस्थित डियाजिओ ग्रुप, यांनी RCB विक्रीसाठी अधिकृतपणे प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली आहेडियाजिओच्या भारतीय शाखा युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “RCB च्या विक्रीची औपचारिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि ही प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.”

या व्यवहारात RCB च्या पुरुष आयपीएल टीमसोबतच महिला प्रीमियर लीग टीमचाही(team) समावेश असणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट जगतात आणि व्यावसायिक वर्तुळात या घडामोडीने मोठी चर्चा निर्माण झाली आहे.USL चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO प्रवीण सोमेश्वर यांनी सांगितले की, “RCB आमच्यासाठी एक प्रतिष्ठित मालमत्ता आहे, मात्र ती आमच्या मुख्य अल्कोहोल व्यवसायासाठी आवश्यक नाही.”

या निर्णयानंतर क्रिकेटप्रेमींच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण झाला आहे — “RCB चा नवा मालक कोण असेल?” विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि स्मृती मंधाना यांच्या नेतृत्वाखालील या संघाचे भविष्य आता नव्या हातात कसे घडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा :

”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या, फराह खानने केला खुलासा
राजस्थनी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘मिरची के टिपोरे’
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, या बड्या नेत्याने सोडली साथ